लग्नानंतर ९ महिन्यात मानसी नाईकने दिली गुड न्यूज?, बेबी बंप फोटोमागचे सत्य आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 12:43 IST2021-10-05T12:42:54+5:302021-10-05T12:43:15+5:30

काही दिवसांपूर्वी मानसी नाईक हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

9 months after the marriage, Mansi Naik gave good news ?, the truth behind the baby bump photo came to light | लग्नानंतर ९ महिन्यात मानसी नाईकने दिली गुड न्यूज?, बेबी बंप फोटोमागचे सत्य आले समोर

लग्नानंतर ९ महिन्यात मानसी नाईकने दिली गुड न्यूज?, बेबी बंप फोटोमागचे सत्य आले समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी मानसी नाईक हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या फोटोनंतर ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता या फोटोमागचे सत्य समोर आले आहे. हा फोटो एका शॉर्ट व्हिडीओमधील आहे.

मानसी नाईकने हा व्हिडीओदेखील नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर तिच्या बेबी बंप मागील फोटोचा खुलासा केला आहे. तिने एक ग्रुप फोटो शेअर करत लिहिले की, हेच ते लवकरच भेटीला येणार आहे. सर्वात आधी त्या सर्वांचे आभार ज्यांनी माझा फोटो पाहून मनू आई होणार म्हणून शुभेच्छा दिल्या. माझा नेहमीच नवीन टॅलेंटला पाठिंबा देतात. या डिजिटल युगात खूप मोठी स्पर्धा असून दिग्गज लोक याकडे दुर्लक्ष करतात. आणि असेही काही आहे ज्याला पक्षपात म्हणतात ज्याला मी देखील प्रत्येक वेळी सामोरे जाते.  मेहनतीचे फळ नक्की मिळते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच मी या सुंदर टीमसोबत काम करायचे ठरविले. हे सर्व खूप छान आहेत. आम्ही जो व्हिडीओ बनवला आहे तो नक्कीच सर्वांना आवडेल, अशी मला आशा आहे. 


मानसी नाईकने पुढे म्हटले की, बेबी बंपवाला फोटो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ती भावना अमूल्य आहे. मला माहित आहे की तुम्ही सर्व मला अशा अवस्थेत पाहण्यासाठी उत्सुक आहात. मी पण वाट पाहत आहे. पण अजून वेळ आहे. एक जन्म स्त्रीची तिच्यामधील भीती घालवून टाकतो आणि तिला मजबूत बनवतो. सर्व आई बनणाऱ्यांना आनंदी प्रेग्नेंसीसाठी खूप शुभेच्छा. मुलगी असो किंवा मुलगा मुलासोबत असण्याचा आनंद काही निराळाच असतो.


मानसी नाईकच्या शॉर्ट व्हिडीओत दोन प्रेग्नेंट महिलांचे जीवन आहे आणि यात माणूसकीचेच दुसरे नाव देव आहे, हे दाखवण्यात आले आहे. 

Web Title: 9 months after the marriage, Mansi Naik gave good news ?, the truth behind the baby bump photo came to light