"सरलं ते सरलं, राहिलं ते...", तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; म्हणाली-"पुन्हा एकदा नव्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:48 IST2025-06-03T12:45:47+5:302025-06-03T12:48:49+5:30

तेजश्री प्रधान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

marathi cinema actress tejashree pradhan shared special post on social media netizens react | "सरलं ते सरलं, राहिलं ते...", तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; म्हणाली-"पुन्हा एकदा नव्याने..."

"सरलं ते सरलं, राहिलं ते...", तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; म्हणाली-"पुन्हा एकदा नव्याने..."

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर तिने अनेक चित्रपट,मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. दरम्यान, तेजश्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काल अभिनेत्रीचा वाढदिवस होता. तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या. त्यांचे आभार मानत तिने खास पोस्ट लिहिली आहे. 


तेजश्री प्रधानने तिच्या सोशल मीडियावर सुंदर अशी पोस्ट लिहून त्यामध्ये म्हटलंय, "प्रिय माझी माणसं, पुन्हा एकदा नव्याने, “माणसांची श्रीमंती आपल्या आयुष्यात फार गरजेची असते आणि सरत्या प्रत्येक वर्षासोबत मी अधिकाधिक श्रीमंत होत्ये” याची ग्वाही तुमच्या शुभेच्छांमधून करून दिलीत यासाठी मनःपूर्वक आभार…"

यानंतर पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "तुमच्या प्रेमाने, मोठ्यांच्या आशीर्वादांनी माझा कालचा वाढदिवस खूपचं छान, मनासारखा पार पडला त्या साठी सुद्धा खूप Thank You, अगदी मनापासून ... बाकी काय! सरलं ते सरलं.. राहीलं ते राहीलं.. ups and downs … lessons learnt… happyLife … achievements… peace… little wisdom… आणि बाकी, थोडं चूकंत-थोडं शिकंत betterment कडे वाटचाल चालूच राहिल. तुम्ही असेच कायम बरोबर रहा.“तू हैं तो गम ना आते हैं, तू हैं तो मुस्कुराते हैं”.लवकरच तुमच्या भेटीला येत्ये… काहीतरी आणखी छान घेऊन."अशा आशयाची पोस्ट लिहून अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडेच अभिनेत्री तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारत होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने अचानक मालिका सोडली. तिला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याशिवाय ती  'होणार सून मी ह्या घरची','अग्गंबाई सासूबाई' या मालिकांसह काही चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे.

Web Title: marathi cinema actress tejashree pradhan shared special post on social media netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.