अजय-रितेशच्या 'रेड-२' मध्ये झळकली २४ वर्षीय मराठी अभिनेत्री; काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:18 IST2025-08-20T16:11:29+5:302025-08-20T16:18:23+5:30
अजय-रितेशच्या 'रेड-२' मध्ये झळकली २४ वर्षीय मराठी अभिनेत्री, काम करण्याचा अनुभवाबद्दल म्हणाली- "तिथे गेल्यावर जाणवलं..."

अजय-रितेशच्या 'रेड-२' मध्ये झळकली २४ वर्षीय मराठी अभिनेत्री; काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाली...
Ritika Shrotri : हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांचा उल्लेख केला तर गाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अजय देवगण. अलिकडेच देवगण, रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि वाणी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'रेड-२' सिनेमाची तुफान चर्चा झाली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. दरम्यान, या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री देखील झळकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री. 'रेड-२' मध्ये रितिकाने अतिशय संवेदनशील भूमिका साकारली.चित्रपटात तिने केलेल्या सगळेच कौतुक करत आहेत.अशातच आता दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने या चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता, याबद्दल भाष्य केलं आहे.
नुकतीच रितिका श्रोत्रीने 'मुक्काम पोस्ट मनोरंज'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रेड-२ मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुखसोबत स्क्रिन शेअर करण्याचा अनुभवाविषयी सांगतिलं आहे. त्यादरम्यान बोलताना अभिनेत्री म्हणाली,"खूप छान अनुभव होता. मी या चित्रपटासाठी पहिल्यांदा एक ऑडिशन दिली होती आणि त्यानंतर मला सिलेक्शन झाल्याचा फोन आला. त्यामध्ये माझं लखनौला अवघ्या सहा दिवसांचं शूट असणार होतं. माझे चित्रपटात मोजून ५-६ सीन्स होते. त्यासाठी मी खूप चांगली तयारी केली होती.त्यानंतर सेटवर गेल्यावर मला जाणवलं की,आता मी हे सगळं बाजूला ठेवून समोर जे येतंय ते केलं पाहिजे. "
पुढे अभिनेत्री म्हणाली," माझा पहिला सीन रितेश सरांसोबत होता. तो खूप छान अनुभव होता.एकतर मी त्यांची मोठी चाहती आहेच.पण, ते खूपच डाऊन-टू-अर्थ आहेत. ते सगळ्यांसोबत आदराने बोलतात. त्यानंतर आमचे बरेच सीन झाले. पहिल्यांदा आमचा त्या सीनचा वाईड सीन झाला आणि मग त्यांचा क्लोज सीन झाला आणि शेवटी माझा क्लोज सीन असणार होता. बऱ्याचदा कलाकार दुसऱ्याचा क्लोज असेल तर सेटवर थांबत नाही,पण रितेश सर तिथेच थांबले होते. तो माझ्यासाठी स्पेशल अनुभव होता."
अजय देवगणबद्दल म्हणाली...
"अजय सरांसोबत जो माझा सीन होता तो ४ मिनिटांतच शूट झाला. तो सीन आम्ही एकदाच केला पण चांगला झाला. तरीही कॅमऱ्यासमोर सीन केला, ते भारी होतं.
सगळ्यात भारी म्हणजे त्यांचं क्लायमॅक्स शूट करताना जवळपास हजार ते पंधराशे लोक तिथे होते. जवळपास तीन दिवस त्या क्लायमॅक्सच्या सीनचं शूट चालू होतं.
ते सगळं पाहून मी भारावून गेले. " असा खुलासा अभिनेत्रीने केला.
'रेड २' हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा सीक्वल आहे.सिनेमात अजय देवगण अमेय पटनायक या ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळाला तर रितेश देशमुखने खलनायकाचं पात्र साकारलं आहे.