'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्रीने फार्महाऊसमध्ये बांधलाय गोठा, दोन गायी दत्तक घेऊन ठेवलं खास नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 17:12 IST2025-06-05T17:12:41+5:302025-06-05T17:12:57+5:30

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी गावी एक फार्महाऊस बांधलं आहे. व्हिडिओमधून या फार्महाऊसची झलक मधुगंधा दाखवत असते. 

marathi actress madhugandha kulkarni adopt two cows shared video | 'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्रीने फार्महाऊसमध्ये बांधलाय गोठा, दोन गायी दत्तक घेऊन ठेवलं खास नाव

'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्रीने फार्महाऊसमध्ये बांधलाय गोठा, दोन गायी दत्तक घेऊन ठेवलं खास नाव

मधुगंधा कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय लेखिका आणि अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करण्यासोबतच तिने काही सिनेमांची निर्मितीही केली आहे. मधुगंधा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी गावी एक फार्महाऊस बांधलं आहे. व्हिडिओमधून या फार्महाऊसची झलक मधुगंधा दाखवत असते. 

या फार्महाऊसमध्येच मधुगंधाने तळंदेखील बांधलं आहे. तसंच यामध्ये प्राण्यांसाठी एक गोठाही बांधण्यात आला आहे. या गोठ्यामध्ये आता दोन नव्या पाहुण्या आल्या आहेत. मधुगंधाने नुकतंच दोन गायी दत्तक घेतल्या आहेत. याबाबत तिने व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. लक्ष्मी आणि सरस्वती अशी त्या गायींची नावे आहेत. "लक्ष्मी आणि सरस्वती एकाच घरात नांदत नाहीत. पण, मी लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींना एकाच दिवशी एकाच घरात घेऊन आले आहे. खरं तर फार्म हाऊस बांधला तेव्हाच गोठ्याची व्यवस्था मी करून ठेवली होती. पण, आजवर कधी गाई दत्तक घेण्याची हिंमत केली नाही. कारण, गायींच्या संगोपनाविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी मला फारशी माहिती नव्हती", असं ती व्हिडिओत म्हणत आहे. 


पुढे ती म्हणते, "मध्यंतरी गोशाळेला भेट देण्याचा योग आला. त्यानंतर माझ्यात गायी पाळण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर मी लक्ष्मी आणि सरस्वतीला दत्तक घेऊन हिरण्यफार्ममध्ये आणलं. मी त्यांना मनापासून आपलंसं केलेलं आहे आणि मला खात्री आहे की त्या पण मला स्वीकारतील. आणि माझ्या हिरण्य फार्मला आपलंसं करतील. आणि लवकरच या हिरण्यफार्मचा लक्ष्मी निवास आणि सरस्वती निवास होईल". 

Web Title: marathi actress madhugandha kulkarni adopt two cows shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.