"बुरखा घालून परीक्षा द्यायला जायचे, कारण...", किशोरी शहाणेंनी पहिल्यांदाच सांगितला 'तो' किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:51 IST2025-06-03T11:48:42+5:302025-06-03T11:51:51+5:30

"बुरखा घालून परीक्षा दिली...", किशोरी शहाणे असं का म्हणाल्या?

marathi actress kishori shahane says in interview about she used to wear a burqa to take exams know the reason | "बुरखा घालून परीक्षा द्यायला जायचे, कारण...", किशोरी शहाणेंनी पहिल्यांदाच सांगितला 'तो' किस्सा 

"बुरखा घालून परीक्षा द्यायला जायचे, कारण...", किशोरी शहाणेंनी पहिल्यांदाच सांगितला 'तो' किस्सा 

Kishori Shahane :किशोरी शहाणे (Kishori Shahane) या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक मराठी चित्रपट मालिका अशा माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ९० च्या दशकात त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'प्रेम करु या खुल्लम खुल्ला', 'वाजवा रे वाजवा', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी','सगळीकडे बोंबाबोंब' अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये किशोरी शहाणे झळकल्या आहेत. दरम्यान, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एक किस्सा शेअर केला आहे. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. 

नुकतीच किशोरी शहाणे यांनी 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. सेलिब्रिटी म्हणजे कायम जपून राहावं लागतं तेव्हा बाहेर जाताना काही प्रॉब्लेम यायचे त्याबद्दल बोलताना किशोरी शहाणेंनी एक मजेशीर किस्सा शेअर केला. त्यादरम्यान, किशोरी शहाणेंनी सांगितलं, "मला परीक्षेला जाताना अशी समस्या निर्माण झाली होती. कारण बारावीच्या बोर्डाचं सेंटर दुसऱ्या कॉलेजमध्ये असल्याने तिकडे जावं लागत असे. माझ्या कॉलेमधील लोक मला ओळखत होते. त्यांच्यासाठी मी विद्यार्थीनी होते शिवाय मी चित्रपटांमध्ये काम करते, असं त्यांना माहित होतं. पण मी जेव्हा बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रावर गेले तेव्हा तिथे प्रॉब्लेम व्हायला लागला. आपल्या समवयीन मुलं बघायचे,अरे! ही तर हिरोईन आहे, ही परीक्षा देते आहे अशा चर्चा सुरु होऊ लागल्या. पहिले एक-दोन दिवस मी बघितलं आणि पण परीक्षा देताना आपल्याला लक्ष केंद्रित करुन पेपर द्यावे लागतात."

त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं, "बोर्डाच्या केंद्रावर परीक्षा देताना मी एकटी आहे. मग मी बुरखा घेतला. माझा एक डिझायनर होता त्याने एका रात्रीत मला बुरखा बनवून दिला. मग मी बुरखा घालून परीक्षा द्यायला जायचे. त्यानंतर बोर्डाच्या सगळ्या परीक्षा मी अशा पद्धतीने दिल्या. " असं मजेशीर किस्सा त्यांनी शेअर केला. 

Web Title: marathi actress kishori shahane says in interview about she used to wear a burqa to take exams know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.