हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? समोर आली हेल्थ अपडेट, म्हणाले- "परमेश्वर कृपेनं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:08 IST2025-06-17T18:01:03+5:302025-06-17T18:08:23+5:30

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? 'साधी माणसं' फेम अभिनेत्याने दिली अपडेट, म्हणाले...

marathi actor amol bavdekar health update after sufferd from heart attack incident | हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? समोर आली हेल्थ अपडेट, म्हणाले- "परमेश्वर कृपेनं..."

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? समोर आली हेल्थ अपडेट, म्हणाले- "परमेश्वर कृपेनं..."

Amol Bavdekar Health Update: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अमोल बावडेकरला (Amol Bavdekar) 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान, हृदयविकाराचा झटका आला. विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात हा प्रयोग होणार होता. त्यानंतर नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आणि अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला तीन तास बाकी असताना अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली होती. अशातच अमोल बावडेकरची प्रकृती सध्या कशी आहे? याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. 'साधी माणसं' मालिकेतील अभिनेते  प्रशांत चौडप्पा यांनी अभिनेत्याच्या हेल्थबद्दल अपडेट दिली आहे. 


नुकतीच अभिनेते प्रशांत चौडप्पा यांनी अभिनेता अमोल बावडेकरची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्याच्या भेटीनंतर सोशल मीडियावर खास पोस्ट करत लिहिलंय, "Doctor Says,  "THE KING IS BACK....आत्ताच अमोल ला भेटून आलो......एकदम मस्त टकाटक, नेहमी सारखाच एनर्जेटिक, आनंदी आणि हसरा..... मी विचारलं काय रे काय हे ? तुला आणि Heart Attack ?? तर त्याच भलतंच, म्हणाला...प्रयोग करायचा आहे रे, नाटकाचे प्रयोग नको थांबायला निर्मात्यांच नुकसान होता कामा नये...माझ्या मुळे रविवारचा प्रयोग cancle झाला........मला काय बोलाव कळेना......ह्या पठ्ठ्याला दोन दिवसापूर्वी सकाळी ६ ला अस्वस्थ वाटल म्हणून वहिनी प्रेरणा बावडेकर आणि फॅमिली फ्रेंड हितेश भाई ह्यांनी हॉस्पिटल ला हलवल तर तिथे समजल हृदय विकाराचा तीव्र झटका आहे, ताबडतोब अँजिओप्लास्टी करावी लागेल...अमोल ला खबर नाही तो डॉक्टरांना म्हणतोय मला ३ तास सोडा माझा नाटकाचा प्रयोग आहे तो करून येतो..डॉक्टर म्हणाले ३ तास काय ३० दिवस हलायच नाही इथून......".

 पुढे त्यांनी म्हटलंय, "परमेश्वर कृपेनं आणि निष्णात डॉक्टरांच्या कृपेने अँजिओप्लास्टी पार पडली. सोमवारी ICU तून बाहेर आणलं, आज मंगळावर भेटायची परवानगी मिळाली. मी भेटायला गेलो.. तर हा एकदम फ्रेश जणू काही झालच नाही..... तेवढ्यात डॉक्टर आले..म्हणून मी पळ काढत होतो पण म्हटल डॉक्टर काय सांगतात म्हणून दाराबाहेर थांबलो.डॉक्टरांचे शब्द कानावर पडले The King Is Back...You are perfectly All Right..... तुमची इच्छा होती ना... लवकरच तुम्ही परत तुमचे प्रयोग करू शकाल. अमोल तू हाडाचा नाही "हृदयाचा" कलाकार आहेस आणि तुझं हृदय तुझ्या एकट्याच नाहीय.... खूप जणा-जणींच आहे. Come on Rock again Dear ....". अशी दिलासादायक पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. 

अमोल बावडेकरला हृदयविकाराचा झटका

रविवारी १६ जून रोजी 'सुंदर मी होणार' या नाटकाचा प्रयोग विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह येथे होता. या प्रयोगाला तीन तास बाकी असताना अमोलला हृदयविकाराचा झटका आला. अमोलची पत्नी प्रेरणा बावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यावर अमोलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रुग्णालयात दाखल केल्यावर अमोलने डॉक्टरांना विनंती केली की, "मला फक्त तीन तासांची परवानगी द्या, मी प्रयोग करुन येतो, नंतर तुम्ही शस्त्रक्रिया करा." मात्र डॉक्टरांनी अमोलला परवानगी दिली नाही. त्यामुळे दीनानाथचा हाउसफुल्ल प्रयोग रद्द करावा लागला.

Web Title: marathi actor amol bavdekar health update after sufferd from heart attack incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.