'अतीच सुंदर आहेस म्हणत दिग्दर्शकांनी नाकारलं', वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:46 PM2024-04-12T12:46:27+5:302024-04-25T17:15:19+5:30

सुंदर असणंही पडलं महागात? चांगल्या सिनेमांमध्ये मिळालं नाही काम

Many directors rejected saying that you are too mainstream look too beautiful told in an interview | 'अतीच सुंदर आहेस म्हणत दिग्दर्शकांनी नाकारलं', वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न

'अतीच सुंदर आहेस म्हणत दिग्दर्शकांनी नाकारलं', वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न

मनोरंजनसृष्टीत कधी कोणत्या कारणामुळे रिजेक्शन मिळेल सांगता येत नाही. या क्षेत्रात नाव कमावणं तसं अवघडच आहे. तसंच इथे जातीवाद, पैसा, प्रसिद्धी, सोशल मीडिया फॉलोअर्स, सौंदर्य, ओळख यावरुनही कोणाला काम मिळेल कोणाला नाही हे ठरवलं जातं. त्यामुळे आऊटसाइडर्सना या क्षेत्रात जम बसवायला काहीसा वेळच लागतो. मात्र अशी एक अभिनेत्री आहे जिला चक्क तू खूपच सुंदर दिसतेस म्हणूनही नाकारलं आहे. तिने स्वत:च काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत हा अनुभव सांगितला होता. कोण आहे ती अभिनेत्री?

2001 साली आलेला 'रहना है तेरे दिल मे' सिनेमा म्हणजे ऑल टाईम फेवरेट लव्हस्टोरी आहे. आजही हा सिनेमा तरुणांच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत आहेच. यातील 'मॅडी'या भूमिकेत आर माधवन झळकला. माधवनच्या मॅडीने सर्वांनाच वेड लावलं होतं. तर दिया मिर्झा (Dia Mirza) ही मुख्य अभिनेत्री होती. दिया खऱ्या आयुष्यात जशी सुंदर आहे तशीच ती या सिनेमात दिसली होती. दिया याच सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नंतर तिने 'दम','तुमसा नही देखा', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी','लगे रहो मुन्नाभाई' अशा काही सिनेमांमध्ये काम केलं तरी पहिल्या सिनेमासारखं यश तिला नंतर मिळालंच नाही. एका मुलाखतीत दिया म्हणाली होती की, "मला नेहमीच अर्थपूर्ण सिनेमांमध्ये काम करायचं होतं. मात्र खूपच मेनस्ट्रीम लूक आहे असं म्हणत दिग्दर्शक मला रिजेक्ट करायचे. जास्तच सुंदर असल्याने मला काम मिळत नव्हतं."

दिया मिर्झाचं वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं. तिची आई बंगाली तर वडील जर्मनचे होते. मात्र तरी ती मिर्झा आडनाव का लावते असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागचं कारण म्हणजे दिया चार वर्षांची असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. नंतर तिच्या आईने हैदराबादच्या अहमद मिर्झाशी दुसरं लग्न केलं. अहमद यांनी दियाला नेहमीच वडिलांचं प्रेम दिलं. यामुळे दिया सावत्र वडिलांचंच नाव लावते.

२०१४ साली दियाने साहिल संघासोबत लग्नगाठ बांधली. साहिल चित्रपट निर्माता आणि लेखक आहे. आपापसातील मतभेदांमुळे 2019 साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर 2021 साली दियाच्या आयुष्यात वैभव रेखीची एन्ट्री झाली. वयाच्या 38 व्या वर्षी दियाने वैभवशी लग्नगाठ बांधली. त्याच वर्षी दियाने मुलाला जन्म दिला. दिया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचं समोर आल्याने खूप चर्चा झाली. 

Web Title: Many directors rejected saying that you are too mainstream look too beautiful told in an interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.