मानसी बनली पीके
By Admin | Updated: July 27, 2016 02:51 IST2016-07-27T02:51:14+5:302016-07-27T02:51:14+5:30
आपल्या दिलखेचक नृत्याच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी मानसी नाईक तिच्या लटक्या-झटक्यांमुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चित्रपट, डान्स, स्टेज

मानसी बनली पीके
आपल्या दिलखेचक नृत्याच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी मानसी नाईक तिच्या लटक्या-झटक्यांमुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चित्रपट, डान्स, स्टेज शोजमध्ये वेगवेगळ्या गीतांवर थिरकणारी आणि रिअॅलिटी शोचे परीक्षण करणारी मराठमोळी मुलगी मानसी आता पीके झाली आहे. तुम्ही म्हणाल की, मानसी पीके झाली आहे, म्हणजे ती कोणत्या सिनेमात आमीर खानचा रोल करतेय का? तर तसे मुळीच नाहीये. एका कार्यक्रमासाठी ती पीके लूकमध्ये अवतरली. या लूकमध्ये मानसी खूपच छान दिसत होती.