Prasad oak : "प्रसाद ओक काय म्हणाल हयावर..?", मिसेस ओकनं शेअर केलेल्या व्हिडीओ एकदा बघाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 12:45 IST2023-01-13T12:22:19+5:302023-01-13T12:45:39+5:30

Prasad Oak : या रिल्समध्ये प्रसादसोबत त्याची बायको मंजिरी सुद्धा दिसतेय. मंजिरीच्या या रिलवर प्रसादनेसुद्धा कमेंट केलीय.

Manjiri oak and actor prasad oak viral reels | Prasad oak : "प्रसाद ओक काय म्हणाल हयावर..?", मिसेस ओकनं शेअर केलेल्या व्हिडीओ एकदा बघाच!!

Prasad oak : "प्रसाद ओक काय म्हणाल हयावर..?", मिसेस ओकनं शेअर केलेल्या व्हिडीओ एकदा बघाच!!

प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak) दोघंही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा दोघांचे रिल्सही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. मंजिरीने नुकताच प्रसादसोबतचे रिल शेअर केलं आहे.

यात मंजिरी आणि प्रसाद दोघेही रोमॅन्टिक मूडमध्ये दिसते. दोघे जिन्यावरुन खाली साध्या कपड्यांमध्ये उतरत असतात अचानक दोघांचं पेहराव बदलतो आणि दोघे पारंपारिक पोशाखा दिसतात. शूट करुन ठेवलेल रील अचानक सापडल्यावर पोस्ट कारायलाच पहिजे ना? प्रसाद ओक काय म्हणाल हयावर? असं कॅप्शन मंजिरीने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर आले मंजिरी च्या मना... तेथे प्रसाद चे चालेना अशी कमेंट केलीय. एक नंबर जोडी, सुंदर,  अशा कमेंट्स चाहत्यांनी यावर केल्या आहेत.

मंजिरी ही प्रसादसोबत अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. शिवाय बिझनेस वुमन अशीही तिची ओळख आहे.  सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून ती छोट्या उद्योजकांना मदत करते.  7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले होते.

प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र होता. मंजिरीला सुद्धा अभिनयाची आवड असल्याने भावाच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आहे. कुणीही कुणाला प्रपोज केलं नाही. पण दोघंही एकमेकांत गुंतले होते. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.


 

Web Title: Manjiri oak and actor prasad oak viral reels