मंदार बनला लेखक
By Admin | Updated: March 15, 2017 01:38 IST2017-03-15T01:38:05+5:302017-03-15T01:38:05+5:30
मंदारने त्याच्या कारकिर्दीत आजवर चित्रपटातील अनेक गीते, मालिकांची शीर्षकगीते लिहिली आहेत. आता एका वेगळ्या रूपात तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मंदार बनला लेखक
मंदारने त्याच्या कारकिर्दीत आजवर चित्रपटातील अनेक गीते, मालिकांची शीर्षकगीते लिहिली आहेत. आता एका वेगळ्या रूपात तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सरगम या कार्यक्रमाच्या भागांचे तो सध्या लिखाण करीत आहे. त्यामुळे आता तो गीतकार असण्यासोबतच लेखकदेखील बनला आहे. याविषयी मंदार सांगतो, की ऊर्मिला कानेटकर-कोठारे या कार्यक्रमाची सूत्रसंचालक असण्यासोबतच त्यांच्या कोठारे कुटुंबाने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. सरगम या कार्यक्रमासाठी मला त्यांच्याकडूनच विचारण्यात आले. सुरुवातीला हे काम मला खूप कठीण वाटले होते. पण आता मला या सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटायला लागल्या आहेत. या कार्यक्रमात येणाऱ्या दिग्गजांविषयी माहिती या कार्यक्रमाद्वारे दिली जाते. त्यांच्याविषयी माहिती गोळा करणे, त्यांचे किस्से गोळा करणे, त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांची गुपिते जाणून घेणे अशा गोष्टी करण्यासाठी त्यांच्यासोबत ज्याने काम केले आहे अशीच व्यक्ती योग्य होती. मी यातील अनेकांसोबत काम केले असल्याने माझे त्यांच्यासोबत चांगले ट्यूनिंग आहे, असे निर्मात्यांना वाटले असल्याने मला या कार्यक्रमाचे लिखाण करण्याची संधी देण्यात आली. हे काम करायला खूप मजा येत आहे आणि त्यातून खूप काही शिकायला मिळत आहे. काही करेक्शन्स असतील तर त्या तिथेच सेटवर करायची गरज असल्याने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी मी तिथेच असतो. पूर्वी असे कार्यक्रम हे वेळखाऊ आहेत, यापासून दूर राहिले पाहिजे असे मला वाटत होते. पण आता मी हे सगळे एन्जॉय करत आहे आणि विशेष म्हणजे हे सगळे करताना माझी गाणी लिहिणेदेखील सुरूच आहे. तसेच सरगमचे शीर्षकगीतदेखील मीच लिहिले आहे.