मनवीर ठरला 'बिग बॉस १०' चा विजेता

By Admin | Updated: January 30, 2017 06:25 IST2017-01-30T06:25:56+5:302017-01-30T06:25:56+5:30

सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरलेला मनवीर गुर्जर बिग बॉस १०चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या अंतिम भागात बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी एक या स्पर्धेचा विजेता ठरणार होता.

Manavir became the winner of 'Bigg Boss 10' | मनवीर ठरला 'बिग बॉस १०' चा विजेता

मनवीर ठरला 'बिग बॉस १०' चा विजेता

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरलेला मनवीर गुर्जर बिग बॉस १०चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या अंतिम भागात बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी एक या स्पर्धेचा विजेता ठरणार होता. मनू पंजाबीने दहा लाख रुपये घेत फिनाले मधून बाहेर पडला, यामुळे बानी, मनवीर व लोपामुद्रा यांच्यात सरळ लढत झाली. यात बानीला मागे टाकत मनवीरने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

मनवीरला ट्रॉफीसह ४० लाख रुपये मिळाले. मनवीरच्या वडिलांनी बक्षिसामधील रक्कमेतील २० लाख रुपये सलमानच्या बीइंग ह्युमन या सामाजिक संस्थेला दान म्हणून दिले आहेत. या शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक बानी फर्स्ट रनर अप तर लोपा सेकंड रनर अप ठरली.

बिग बॉसच्या फिनालेमध्ये हृतिक रोशन व यामी गौतम यांनी हजेरी लावली होती. रंगतदार ठरलेल्या फिनालेची सुरुवात सलमान खानच्या डान्सने झाली. बिग बॉसच्या फिनालेमध्ये प्रियांका जग्गा व स्वामी ओम सोडून अन्य सर्व स्पर्धक सामील झाले होते. ओम स्वामीला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे असेही सांगण्यात येते.

Web Title: Manavir became the winner of 'Bigg Boss 10'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.