मामू रणबीर ‘समारा’वर लट्टू
By Admin | Updated: October 13, 2015 03:24 IST2015-10-13T03:24:18+5:302015-10-13T03:24:18+5:30
रणबीर कपूर सध्या अनुष्का शर्मासोबत करण जोहरच्या ‘ये दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पॅरीसमध्ये आहे.

मामू रणबीर ‘समारा’वर लट्टू
रणबीर कपूर सध्या अनुष्का शर्मासोबत करण जोहरच्या ‘ये दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पॅरीसमध्ये आहे. या काळात चित्रपटाची सगळी टीम येथील प्रसिद्ध ‘लव-लॉक ब्रिज’ येथे गेली होती. ‘येथे भेट देणारे लव्हर्स एका कुलपावर आपले आणि आपल्या लव्हरचे नाव लिहितात व ते कुलूप येथील चारभिंतीत लॉक करून त्याची चावी पाण्यात फेकून देतात. असे केल्यावर त्यांच्यातले प्रेम नेहमीसाठी कायम राहते, असे येथील लोकांचे मानणे आहे. रणबीर कपूरने त्या कुलपावर त्याच्यासोबत त्याची गर्लफे्रंड कॅटचे नाव न लिहिता, त्याची बहीण रिदिमाची मुलगी ‘समारा’चे नाव लिहिले.