प्रसिद्ध अभिनेत्याचा २५ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोट न घेताच पत्नीपासून झाला वेगळा, म्हणाला- "गेल्या २ वर्षांपासून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:25 IST2026-01-02T17:24:44+5:302026-01-02T17:25:38+5:30
सेलिब्रिटी कपलचा २५ वर्षांचा संसार मोडला आहे. मल्याळम अभिनेते मनु वर्मा पत्नीपासून वेगळे झाले आहेत. अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही.

प्रसिद्ध अभिनेत्याचा २५ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोट न घेताच पत्नीपासून झाला वेगळा, म्हणाला- "गेल्या २ वर्षांपासून..."
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कलाविश्वातून एक बातमी समोर येत आहे. सेलिब्रिटी कपलचा २५ वर्षांचा संसार मोडला आहे. मल्याळम अभिनेते मनु वर्मा पत्नीपासून वेगळे झाले आहेत. अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही. मात्र मनु वर्मा यांनी पत्नी सिंधू वर्मासोबत असलेलं आपलं नातं मोडलं आहे. त्या दोघांनीही घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असून गेल्या दोन वर्षांपासून ते वेगळे राहत आहेत.
मनु वर्मा यांनी मुव्ही वर्ल्ड मीडियाशी बोलताना पत्नीपासून वेगळं राहत असल्याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, "मी आणि माझी पत्नी वेगळे झालो आहोत. अद्याप कायदेशीररित्या आमचा घटस्फोट झालेला नाही. पण, आम्ही पुन्हा एकत्र येण्याच्या कोणत्याही शक्यता दिसत नाहीत. आम्ही प्रेमात पडलो आणि एकत्र आयुष्य जगू लागलो हे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरलेला नाही. कारण आमच्यापेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करणारी आणि एकत्र राहणारी जोडपीही वेगळी झाली आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. पण, या गोष्टीसाठी फार काळ लागला नाही".
"नात्यात जुळवून घेण्याची क्षमता नसेल तर वेगळं होणंच चांगलं आहे. उगाच जुळवून घेत एकत्र राहण्यात काहीच अर्थ नाही. एकत्र राहताना अजून प्रॉब्लेम निर्माण झाले तर काय? हे परदेशातही होत नाही का? वेगळे झाल्यानंतरही लोक त्यांच्यातील मैत्रीचं नातं जपतात. तसंच आपल्याकडे घडलं तर चांगलं होईल. पण, तसं झालं तर घटस्फोटाचं प्रमाण वाढेल. वेगळं झाल्यानंतर मैत्री ठेवण्यात काहीच चुकीचं नाही. पण इथे केरळमध्ये तसं होत नाही", असंही ते पुढे म्हणाले.
मनु वर्मा आणि सिंधू वर्मा यांना ३ मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत आयटी इंजिनियर म्हणून नोकरी करतो. दुसरा मुलगा बंगळुरूमध्ये असतो. तर त्यांच्या मुलीला शारीरिक स्वास्थाच्या तक्रारी आहेत. मनु वर्मा हे दिवंगत अभिनेते जगन्नाथ वर्मा यांचे पुत्र आहेत.