मलायकाने ‘पोटगी’साठी मागितले 15 कोटी?

By Admin | Published: December 30, 2016 03:21 AM2016-12-30T03:21:55+5:302016-12-30T03:21:55+5:30

अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांच्यात आता काहीच उरले नाही, त्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर केला आहे. सहा महिन्यात त्यांचा घटस्फोट

Malaika asked for a fortification of 15 crores? | मलायकाने ‘पोटगी’साठी मागितले 15 कोटी?

मलायकाने ‘पोटगी’साठी मागितले 15 कोटी?

googlenewsNext

अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांच्यात आता काहीच उरले नाही, त्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर केला आहे. सहा महिन्यात त्यांचा घटस्फोट होणार असे मानले जातेय. मलायका अरोरा हिने घटस्फोटानंतर पोटगी म्हणून कोट्यावधीची रक्कम मागितली असल्याचे सुत्रांकडून कळतेय. मलायका अरोरा व अरबाज खान यांनी मुंबई येथील वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा रितसर अर्ज दिला असून त्यावर दुसरी सुनावणी झाली आहे. सुत्रांनुसार, दुसऱ्या समुपदेशनाला दोघांनी हजेरी लावली होती. सध्या दोघांचा ‘कुलिंग आॅफ पिरियेड’ सुरू असून मलायकाने घटस्फोटानंतर पोटगी म्हणून अरबाजकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे समजते. अरबाज खानने मलायकाची ही मागणी मान्य केली असून ही रक्कम देण्याची तयारी त्याने दर्शविली आहे. सुत्रांनुसार, दोघे पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता फार कमी आहे. सध्या अरबाज व मलायका यांची दोन्ही मुले आई मलायकाकडेच आहेत.

Web Title: Malaika asked for a fortification of 15 crores?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.