वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा

By देवेंद्र जाधव | Updated: July 13, 2025 11:59 IST2025-07-13T11:58:47+5:302025-07-13T11:59:05+5:30

इंडस्ट्रीतील एका 'महा'नटाची काळी बाजू महेश टिळेकर यांनी उलगडली आहे. महेश नेमकं काय म्हणाले हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल

mahesh tilekar talk about marathi actor dont want to perform dance with Varsha Usgaonkar | वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा

वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा

'मराठी तारका' हा शो जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणजे महेश टिळेकर. महेश यांनी नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीची काळी बाजू सांगितली. ते म्हणाले की, "मी तारे तारका नावाचा शो केला. मराठीतले २० हिरो आणि २० हिरोईन त्या शोमध्ये होते. मराठी इंडस्ट्रीला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तो शो केला होता. इंडस्ट्रीतील सगळे कलाकार तिथे परफॉर्म करायला होते. अक्षरशः निळू भाऊ, कुलदीप पवारही होते. रती अग्नीहोत्रींनी सुद्धा परफॉर्मन्स केला होता."

"त्याचवेळेस मी वर्षाजींसोबत (वर्षा उसगावकर) डान्स करायला त्यांच्यासोबत काम केलेल्या एका महानटाला विचारलं. तर तो म्हणाला नाही! मी केलं तर माझ्या बायकोसोबतच परफॉर्म करणार. वर्षा उसगावकरांसोबत करणार नाही. त्यावेळी आमचं मानधनाचं बोलणं झालं. तेव्हा त्यांनी माझ्याकडे ५ लाख रुपये मागितले. २००७ ची ही गोष्ट आहे. त्यावेळी पाच लाख रुपये केवढे झाले. मी इंडस्ट्रीसाठी हे करत होतो. सगळे इ़ंडस्ट्रीतील कलाकार एकत्र येत होते. कोणी पैशांची मागणी केली नव्हती. महेश तू करतोय ना, आम्ही आहोत सपोर्टला असं सर्वजण मला म्हणाले होते. या प्रत्येकाला मी अक्षरशः ५ हजार रुपये वगैरे पॉकेटमनी दिलं होतं. पण कोणीही काही म्हणालेलं नाही."

"पण त्या महानटाने, ज्याला इंडस्ट्री ऑलराऊंडर नट समजलं जातं, त्याने मला ही अट घातली. मला वाटलं होतं की,  वर्षा उसगावकर आणि त्यांनी सिनेमात एकत्र काम केलं  होतं. त्यामुळे ती जोडी आली तर बरं होईल. पण त्यांनी अट घातली की, त्यांच्याबरोबर करणार नाही. केलं तर, माझ्या बायकोसोबत परफॉर्म करणार आणि त्यासाठी पाच लाख. मी त्यांना मग म्हटलं, तुम्ही मोठे तुमच्या घरी. बाकी सगळे इंडस्ट्रीतले एकत्र आले  होते. सुबोध, स्वप्नील,  भरत वगैरे सगळे एकत्र आले होते. असा सोहळा पुन्हा माझ्या हातून होणार नाही. "

Web Title: mahesh tilekar talk about marathi actor dont want to perform dance with Varsha Usgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.