महेश कोठारेंना उद्योगरत्न पुरस्कार
By Admin | Updated: March 14, 2015 22:53 IST2015-03-14T22:53:40+5:302015-03-14T22:53:40+5:30
विविध चित्रपट आणि मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन आणि अभिनयही करीत गेली कित्येक वर्षे महेश कोठारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांच्या जय मल्हार मालिकेने तर लोकप्रियतेचा कळस गाठला आहे.

महेश कोठारेंना उद्योगरत्न पुरस्कार
विविध चित्रपट आणि मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन आणि अभिनयही करीत गेली कित्येक वर्षे महेश कोठारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांच्या जय मल्हार मालिकेने तर लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीचा गौरव नुकताच जागतिक मराठी चेंबर्स आॅफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महेश कोठारेंना उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.