Video: १३ वर्षांच्या सिताराचा रॅम्प वॉकवर जलवा; महेश बाबूच्या लेकीने लुटली लाइमलाइट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 09:02 IST2026-02-02T09:01:30+5:302026-02-02T09:02:10+5:30
सिताराचा रॅम्प वॉक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. सिताराच्या हा व्हिडीओ एका इव्हेंटमधला आहे. जिथे तिने रॅम्प वॉक केला.

Video: १३ वर्षांच्या सिताराचा रॅम्प वॉकवर जलवा; महेश बाबूच्या लेकीने लुटली लाइमलाइट
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची लेक सितारा चर्चेत आली आहे. सिताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे. सिताराचा रॅम्प वॉक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. सिताराच्या हा व्हिडीओ एका इव्हेंटमधला आहे. जिथे तिने रॅम्प वॉक केला.
अलिकडेच सितारा तिची आई आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत एका ज्वेलरी एक्झिबिशनच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये गेली होती. या इव्हेंटमध्ये सिताराने रॅम्प वॉक करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सिताराने या इव्हेंटसाठी खास लूक केला होता. सिल्व्हर ड्रेस तिने परिधान केला होता. तर ज्वेलरी घालत हलकासा मेकअपही केला होता. पण, अवघ्या १३ वर्षांच्या सिताराचा आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरील स्माइलने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. सिताराच्या या रॅम्प वॉकच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "तिच्या आईसारखीच आहे...मिस इंडिया होईल", "हिला नजर नको लागायला", "हँडसम सुपरस्टार हिरो महेश बाबूची मुलगी आहे", "भावी मिस इंडिया" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी करत सिताराचं कौतुक केलं आहे.
महेश बाबूने मराठमोळ्या नम्रता शिरोडकरसोबत २००५ मध्ये लग्न करत संसार थाटला. त्यांची जोडी ही लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. महेश बाबू आणि नम्रता यांना दोन मुलं आहेत. मुलीचं नाव सितारा आणि मुलाचं गौतम असं आहे.