'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र, गिफ्ट म्हणून दिले सुंदर कानातले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:11 PM2024-05-02T12:11:27+5:302024-05-02T12:12:33+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेले सर्वच कलाकार आज स्टार झाले आहेत.

Maharashtrachi Hasya Jatra Fame Prasad Khandekar special letter and beautiful gift for Namrata Sambherao | 'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र, गिफ्ट म्हणून दिले सुंदर कानातले

'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र, गिफ्ट म्हणून दिले सुंदर कानातले


अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांची जोडी कायम चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या माध्यमातून नम्रता-प्रसाद यांची जोडी चांगलीच गाजली. अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही सध्या तिच्या नाच गं घुमा (Nach Ga Ghuma) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  आता प्रसाद खांडेकरनं (Prasad Khandekar) नम्रताला हटके पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादनं नम्रताला खास पत्र लिहिलं आहे आणि एक सुंदर गिफ्ट देखील दिलं आहे.

नम्रतानं या पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रसादनं नम्रताला दिलेलं खास गिफ्ट देखील दिसत आहे.  'नमा' नाव लिहिलेले हे कानातले खूपच सुंदर दिसत आहेत. प्रसादनं पत्रामध्ये लिहिलं, 'महाराष्ट्राची लाडकी आणि टॅलेंटेड अभिनेत्री नमा! १ मे ला तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा ज्यात तू प्रमुख भूमिका करतेय असा 'नाच गं घुमा'  प्रदर्शित होतोय. तू खूप वर्षे या क्षणाची वाट पाहिलीस आणि आज तो क्षण आला'.

पुढे तो म्हणतो, 'आताचा हा संपूर्ण काळ जगून घे…यातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घे. यापुढे अजून खूप सुपरहिट सिनेमे तुझ्या नावावर लागतील पण, पहिला चित्रपट तुझ्या कायम स्मरणात राहील. म्हणून १ मे पासून प्रत्येक क्षण साठवून ठेव आणि घरात अवार्ड्ससाठी जागा पण करून ठेव…खूप खूप शुभेच्छा तू सुपरस्टार आहेस'. विशेष म्हणजे, हे पत्र प्रसादने 'नाच गं घुमा' सिनेमा प्रदर्शित व्हायच्या एक दिवस आधी लिहिलं होतं. 

प्रसादनं पत्रामध्ये तळटीप म्हणून लिहलं, 'मोबाईल फॉर्मेट झाला तर पाठवलेले मेसेज अनेकदा डिलीट होतात पण, कागद तसाच राहतो. म्हणून हे पत्र लिहलं आहे. तुझ्या पहिल्या सुपरहीट सिनेमासारखा हा कागदही दिर्घकाळ टिकेल, तु हरवला नाहीस तर'. यावर नम्रतानं खास पोस्ट करत प्रसादचे आभार मानले. तिनं लिहले, 'सिनेमा रिलीज व्हायच्या एक दिवस आधी तू हे पत्र लिहिलंस तू नेहमीच प्रोत्साहन देत आलायस, सिनेमा सगळीकडे हाऊसफुल चाललाय, इतकं सूंदर surprise मेरा सच्चा दोस्त, This is so precious pashya, What a surprise, speechless, lovely creative gift, आणि पत्र लिहिलंस तू किती भारी रे पश्या'.   'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मे २०२४ ला महाराष्ट्रात रिलीज होतोय.

Web Title: Maharashtrachi Hasya Jatra Fame Prasad Khandekar special letter and beautiful gift for Namrata Sambherao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.