video : माधुरी दीक्षितच्या मुलानं दोन वर्ष केस कापलेच नाहीत; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 11:29 IST2021-11-08T11:27:54+5:302021-11-08T11:29:22+5:30

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ Madhuri Dixit सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. पण सध्या तिचा मुलगा चर्चेत आहे. होय, माधुरीच्या धाकट्या मुलानं असं काही केलं की, तुम्हालाही अभिमान वाटेल.

Madhuri Dixit shares video of son Ryan donating hair to cancer patients, fans call him true hero | video : माधुरी दीक्षितच्या मुलानं दोन वर्ष केस कापलेच नाहीत; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

video : माधुरी दीक्षितच्या मुलानं दोन वर्ष केस कापलेच नाहीत; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. पण सध्या तिचा मुलगा चर्चेत आहे. होय, माधुरीच्या धाकट्या मुलानं असं काही केलं की, तुम्हालाही अभिमान वाटेल.
होय,   नुकताच माधुरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ  तिच्या मुलाचा आहे. माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत माधुरीचा लहान मुलगा रियान आहे. या व्हिडीओत रियान त्याचे केस कापताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ शेअर करत माधुरीने लिहिलं की, ‘सगळे हीरो टोपी घालत नाहीत.  पण माझा हीरो घालतो. नॅशनल कॅन्सर डे निमित्त, मला खरोखर काही तरी खास सांगायचं आहे. जेव्हा रियान  कॅन्सर रूग्णांना किमो थेरपी घेताना पाहायचा, तेव्हा त्याला वाईट वाटायचं. कॅन्सर रूग्ण सगळं झेलतात, अगदी डोक्यावरचे केसही गमावून बसतात. अशात माझ्या मुलाने कॅन्सर सोसायटीला त्याचे केस दान करण्याचा निर्णय घेतला. पालक म्हणून  त्याच्या या निर्णयाने आम्ही हुरळून गेलो होतो. गाईडलाईन्सनुसार, रियानने दोन वर्ष केस कापले नाहीत. जेणेकरून ते निश्चित लांबीपर्यंत वाढतील. केसांची आवश्यक लांबी वाढवण्यासाठी त्याने 2 वर्ष वाट पाहिली आणि  आणि हा शेवटचा टप्पा होता. आज मला त्याच्या अभिमान आहे,’ असं माधुरीने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.
व्हिडीओत माधुरीने तिचा पती डॉ. श्रीराम नेने यांनाही टॅग केलं आहे. माधुरीने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून तिच्यावर आणि रियानवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

अशी झाली होती माधुरी-नेनेंची पहिली भेट
माधुरी आणि श्रीराम नेने यांची पहिली भेट अगदी योगायोगाने झाली होती; पण पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली. या दोघांची पहिली भेट लॉस एंजिल्स येथे माधुरीच्या भावाच्या पार्टीमध्ये झाली. माधुरी सुपरस्टार होती; पण डॉ. नेने यांना याची काहीच कल्पना नव्हती. माधुरी एक अभिनेत्री आहे आणि ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करते, हे देखील त्यांना माहीत नव्हते. एकदा डॉ. नेने यांनी माधुरीला आपल्याबरोबर डोंगरावर बाइकवरून येण्यासंबंधी विचारले आणि माधुरीनं त्याला होकार दिला. पण बाईकवरून डोंगरावर जाणे फार कठीण होते़ मात्र इथूनच माधुरी आणि श्रीराम नेने एकमेकांच्या अधिक जवळ आले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Madhuri Dixit shares video of son Ryan donating hair to cancer patients, fans call him true hero