म. फुलेंचा जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर
By Admin | Updated: December 3, 2015 02:45 IST2015-12-03T02:45:35+5:302015-12-03T02:45:35+5:30
‘बायोपिक’ हा नवा टे्रंड सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये रुजला आहे. अगदी राजकारण्यांपासून कार्यकर्ते, विचारवंत आणि सामाजिक सुधारणावाद्यांचा जीवनप्रवास

म. फुलेंचा जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर
‘बायोपिक’ हा नवा टे्रंड सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये रुजला आहे. अगदी राजकारण्यांपासून कार्यकर्ते, विचारवंत आणि सामाजिक सुधारणावाद्यांचा जीवनप्रवास कॅमेऱ्यात बंदिस्त झाला आहे. त्यामध्ये शिक्षणाची कवाडे खुली करणारे महात्मा फुले यांची आता भर पडणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे ‘सत्यशोधक’ नाटक रंगभूमीवर गाजले. या नाटकाचे इतर भाषांमध्येही प्रयोग झाले... ‘सत्यशोधक... तमसो मा ज्योतिर्गमय:’ या शीर्षकांतर्गतच महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. शिक्षण, कृषी, जातीय व्यवस्था या मुद्द्यांबरोबरच महिलांना सामाजिक स्थान मिळण्यासाठी महात्मा फुले यांनी समतेचा लढा उभारला. समता फिल्म्सच्या माध्यमातून योगेश जाधव या चित्रपटाची निर्मिती करीत असून, नीलेश जळमकर हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. ‘जोतिबा फुले’ यांची व्यक्तिरेखा ‘डोंबिवली फास्ट’फेम संदीप कुलकर्णी साकारणार आहे.