हिट चित्रपटानंतरही करिअर ग्राफ खालीच
By Admin | Updated: November 7, 2015 00:46 IST2015-11-07T00:46:54+5:302015-11-07T00:46:54+5:30
बिग बॉसच्या या सिझनमध्ये भाग घेणाऱ्या रिमी सेनसोबत एक रोचक सत्य जुडले आहे. रिमीच्या करिअरवर एक नजर टाकली, तर लक्षात येईल की तिच्या नावावर एकाहून एक मोठे चित्रपट आहेत.

हिट चित्रपटानंतरही करिअर ग्राफ खालीच
बिग बॉसच्या या सिझनमध्ये भाग घेणाऱ्या रिमी सेनसोबत एक रोचक सत्य जुडले आहे. रिमीच्या करिअरवर एक नजर टाकली, तर लक्षात येईल की तिच्या नावावर एकाहून एक मोठे चित्रपट आहेत. तरीही ज्या अभिनेत्री बॉलीवूडमध्ये मोठे यश मिळविण्यात यशस्वी ठरल्या नाहीत त्यात रिमाचे नाव घ्यावे लागेल. रिमीचे करिअर पाहिले तर, तिच्या खात्यात प्रियदर्शनच्या तीन मोठ्या हिट चित्रपटांचे नाव जोडलेले आहे. या चित्रपटांमध्ये हंगामा, क्योंकि आणि गरम मसाला आहे. रिमीला अमिताभच्या बागबान आणि अनीस बज्मी यांच्या फिर हेराफेरी सोबतच यशराजच्या धूम आणि धूम २ मध्ये काम करण्याचीही संधी मिळाली. रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजच्या पहिल्या भागात मुख्य भूमिकेत होती. रिमीचे हे सर्व चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरले, मात्र त्यानंतर बॉलीवूडमध्ये पाहिजे तसे यश मिळाले नाही. ग्रेसी सिंहनेही हिट चित्रपटात काम केले. लगानमध्ये ती आमिर तर राजकुमार हिरानींच्या मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये संजय दत्तसोबत आणि प्रकाश झा यांच्या गंगाजलमध्ये अजय देवगनची अभिनेत्री बनली. एवढ्या स्टारसोबत काम केल्यानंतर ग्रेसीचे कोठेच नामोनिशाण राहिले नाही. मधूचीही आठवण या वेळी होते. फूल और कांटेमध्ये अजय देवगनसोबत तिला लांँच करण्यात आले होते. फूल और कांटेनंतर ती साऊथकडे वळली आणि मणिरत्नमच्या रोजाच्या मोठ्या यशासोबतच बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. ऐलान चित्रपटालाही यश मिळाले. एवढे झाल्यानंतरही मधू आपले करिअर निट सावरू शकली नाही. राजकारणात जाणाऱ्या नगमाची कथाही अशीच आहे. सलमान खानसोबत बागीमध्ये ती आली. यानंतर तिच्या चित्रपटांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर यल्गारमध्ये संजय दत्त आणि राकेश रोशनच्या किंग अंकलमध्ये शाहरूखसोबत काम केले. लाल बादशाहमध्ये अमिताभ बच्चन तिच्यासोबत होते. एवढ्या मोठ्या स्टारसोबत काम केल्यानंतरदेखील नगमा बॉलीवूडमध्ये आपले स्थान पक्के करू शकली नाही.
- anuj.alankar@lokmat.com