विशाल ‘टीपी’च्या प्रेमात
By Admin | Updated: March 28, 2015 23:08 IST2015-03-28T23:08:38+5:302015-03-28T23:08:38+5:30
विशाल-शेखर या जोडगोळीतील विशाल दादलानीला मराठी चित्रपटांची चांगलीच भुरळ पडली आहे. त्याने काही मराठी चित्रपटांसाठी गायलेली गाणी लोकप्रिय ठरली.

विशाल ‘टीपी’च्या प्रेमात
विशाल-शेखर या जोडगोळीतील विशाल दादलानीला मराठी चित्रपटांची चांगलीच भुरळ पडली आहे. त्याने काही मराठी चित्रपटांसाठी गायलेली गाणी लोकप्रिय ठरली. त्याच्या या कल्ल्यामुळेच रवी जाधवच्या 'टाइमपास २’ चित्रपटात पुन्हा विशालचे गाणे ऐकायला मिळणार आहे. वाऊ वाऊ...हे चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेले गाणे विशालने गायले आहे. या गाण्याची झलक सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर ऐकायला मिळत असली तरी पूर्ण गाणे लवकरच ऐकायला मिळेल असे रवी जाधवने स्पष्ट केले आहे