‘लॉस्ट अँड फाउंड’ २९ जुलैला प्रदर्शित

By Admin | Updated: July 20, 2016 02:37 IST2016-07-20T02:37:05+5:302016-07-20T02:37:05+5:30

‘लॉस्ट अँड फाउंड’ या मराठी चित्रपटाच्या इंग्रजी नावावरूनच, या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण होते आहे.

'Lost and Found' displayed on July 29 | ‘लॉस्ट अँड फाउंड’ २९ जुलैला प्रदर्शित

‘लॉस्ट अँड फाउंड’ २९ जुलैला प्रदर्शित


‘लॉस्ट अँड फाउंड’ या मराठी चित्रपटाच्या इंग्रजी नावावरूनच, या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण होते आहे. दिवसेंदिवस शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर माणसांची गर्दीदेखील वाढत आहे आणि ह्या माणसांच्या गर्दीतली माणसं मात्र गर्दीत एकाकी आहेत! हा विरोधाभास जरी वाटत असला, तरी हेच सत्य आहे. जागतिक पातळीवर, भारतात सर्वाधिक असून अगदी फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या, ‘व्हर्च्युअल गर्दी’तसुद्धा माणूस एकटा पडलाय ! एकाकी पडलेल्या व्यक्तीला फक्त हवं असतं, त्याचं हे ‘एकटेपण,’ ऐकून घेणारा आणि ‘हो मी समजू शकतो’ म्हणणारा कोणी एक चित्रपटातील, सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी ह्यांच्या एकाकीपणातूनच त्यांची प्रेमकथा सुरू होते का ? त्यांनी आपापल्या आयुष्यात काहीतरी गमावलाय का? जे गमावलंय ते त्यांना गवसतं का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला २९ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ ह्या अत्यंत हटके आगामी चित्रपटात मिळणार आहे. निर्माते विनोद मलगेवार ह्यांनी ह्या ‘हटके’ चित्रपटाची निर्मिती केली असून गमावण्याचा आणि गवसण्याचा प्रवास लेखक ऋतुराज धालगडे यांनी चित्रपटाच्या कथेत इतका सुंदरपणे मांडला आहे, की प्रत्येक जणच ह्या चित्रपटाशी समरस होईल! शिवाय कथेबरोबर पटकथा आणि संवाददेखील धालगडे ह्यांनी लिहिले असून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.

Web Title: 'Lost and Found' displayed on July 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.