‘सांगतो ऐका’ची निवड दादासाहेब फाळके महोत्सवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 01:46 IST2016-04-21T01:46:16+5:302016-04-21T01:46:16+5:30
आपल्या सर्वांमध्ये एक हिरो राहतो फक्त आपल्याला त्याला शोधता आले पाहिजे, या संकल्पनेवर आधारित ‘सांगतो ऐका’ चित्रपटाची निवड प्रतिष्ठित दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये झाली

‘सांगतो ऐका’ची निवड दादासाहेब फाळके महोत्सवात
आपल्या सर्वांमध्ये एक हिरो राहतो फक्त आपल्याला त्याला शोधता आले पाहिजे, या संकल्पनेवर आधारित ‘सांगतो ऐका’ चित्रपटाची निवड प्रतिष्ठित दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये झाली. महाराष्ट्रातील एका छोट्याशा कांबळवाडी या गावामध्ये घडून आलेली ही कथा आहे एका दारूड्या स्टँडअप कॉमेडियन आंबटराव घोलप (सचिन पिळगावकर) यांची. पत्नी आणि मुलगा यांना जेव्हा त्यांची लाज वाटू लागते, तेव्हा मात्र हा दारूड्या आपली समयसूचकता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांच्या नजरेत हिरो बनतो. सतीश राजवाडेदिग्दर्शित या चित्रपटात सचिन पिळगावकर, संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, मिलिंद शिंदे, जगन्नाथ निवंगुणे, भाऊ कदम, वैभव मांगले, विजय चव्हाण यांच्या भूमिका आहेत. सतीश राजवाडे याबद्दल सांगतात, की या चित्रपटाची दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये अधिकृत निवड होणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तर, याआधी कधीही न झालेली ही वेगळी भूमिका मला करायला अतिशय आवडली, असे सचिन पिळगावकर यांनी सांगितले.