‘माणूस एक माती'चे पोस्टर लाँच

By Admin | Updated: February 4, 2017 03:17 IST2017-02-04T03:17:56+5:302017-02-04T03:17:56+5:30

वे गळे कथानक आणि आशयघन विषयावर आधारित ‘माणूस एक माती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, त्याचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाँच

Launch a man's poster | ‘माणूस एक माती'चे पोस्टर लाँच

‘माणूस एक माती'चे पोस्टर लाँच

वे गळे कथानक आणि आशयघन विषयावर आधारित ‘माणूस एक माती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, त्याचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाँच करण्यात आले. सध्या प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र आहे. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. या धकाधकीच्या जीवनात लोकांना नात्यांचा कसा विसर पडतोय, याचे चित्रण करणारा ‘माणूस एक माती’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ एका वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळत आहे. सिद्धार्थचा हा लुक त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश झाडे असून संगीतकार-गीतकार प्रशांत हेडाऊ आणि अमर देसाई आहेत. बदलत्या काळातली नाती, नात्यांकडे पाहण्याचा बदलणारा दृष्टिकोन या आशयसूत्रावर ‘माणूस एक माती’ आधारित आहे. हा एक सकस कौटुंबिक चित्रपट आहे. सिद्धार्थ जाधव आणि गणेश यादव यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तसेच स्वप्निल राजशेखर, रुचिता जाधव, हर्षा गुप्ते आणि वरद चव्हाण हे कलाकारदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर अंगावर शहारा आणणारे आहे. यात एक म्हातारा माणूस आपल्याला दिसत आहे. या म्हाताऱ्याचे केस, दाढी वाढलेली असून तो प्रचंड दु:खी दिसतोे. हा म्हातारा माणूस सिद्धार्थ जाधव आहे. सिद्धार्थचा या चित्रपटातील मेकअप खूपच चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे. त्यामुळे तो म्हातारा सिद्धार्थ असल्याचे काही क्षण आपल्याला ओळखताच येत नाही. हा चित्रपट येत्या २४ मार्च रोजी रिलीज होईल.

Web Title: Launch a man's poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.