क्या बात! जाता जाता एकाला दृष्टी देऊन गेला Puneet Rajkumar, दान केले अभिनेत्याचे डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 04:10 PM2021-10-30T16:10:14+5:302021-10-30T16:11:50+5:30

Puneeth Rajkumar Died in Gym : दिग्गज अभिनेते डॉ. राजकुमार यांनी १९९४ मध्ये स्वत: आपल्या संपूर्ण परिवाराचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला होता.

Late Kannada star Puneet Rajkumar illuminated a life on the way donated the eyes of the actor/ | क्या बात! जाता जाता एकाला दृष्टी देऊन गेला Puneet Rajkumar, दान केले अभिनेत्याचे डोळे

क्या बात! जाता जाता एकाला दृष्टी देऊन गेला Puneet Rajkumar, दान केले अभिनेत्याचे डोळे

googlenewsNext

कन्नड सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार (Puneet Rajkumar) चं २९ ऑक्टोबरला हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं. या बातमीने साउथ सिने इंडस्ट्री आणि त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. केवळ ४६ वयात अचानक  अशाप्रकारे या अभिनेत्याचं निधन झाल्याने सर्वांनाच (Puneeth Rajkumar Died in Gym) धक्का बसला आहे. राजकीय लोक असो वा सिने विश्वातील लोक असो ते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. अशात त्याच्याबाबत एक खास बातमी समोर आली आहे, ज्याबाबत वाचून तुम्ही इमोशनल व्हाल. बातमी आहे की, अभिनेता पुनीत राजकुमारचे डोळे डोनेट करण्यात आले आहेत.

पुनीतचे वडील सुपरस्टार अभिनेते राजकुमार यांनीही आपले डोळे दान केले होते. तेच पुनीतनेही केलं. दिग्गज अभिनेते डॉ. राजकुमार यांनी १९९४ मध्ये स्वत: आपल्या संपूर्ण परिवाराचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. राजकुमार यांचं निधन २००६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं. आता अभिनेता चेतन कुमारने ट्विट करत माहिती दिली की, डॉक्टरांच्या एका टीमने पुनीतच्या निधनाच्या सहा तासांच्या आत एक ऑपरेशन करून त्याचे डोळे एका नेत्रहीनाला दिले.

अभिनेता चेतन कुमारने पोस्टमध्ये लिहिलं की, 'जेव्हा मी अप्पू सरांना बघण्यासाटी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा निधनानंतर सहा तासांच्या आत त्यांचे डोळे काढण्यासाठी डॉक्टरांची एक टीम आली होती. ज्याप्रकारे डॉक्टर राजकुमार आणि निम्माशिवा यांनी नेत्रदान केलं होतं. तसंच अप्पू सरनेही नेत्रदान करून उदाहरण सादर केलं. सोबतच त्याने लोकांनाही अपील करत त्याच्यासारखं नेत्रदान करण्यास सांगितलं.

पुतीनचं वय ४६ वर्षे होतं आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. फिटनेस फ्रीक म्हटल्या जाणाऱ्या पुनीतला जिममध्ये दोन तास एक्सरसाइज केल्यानंतर छातीत वेदना सुरू झाल्या होत्या. पुनीतची तब्येत बिघडल्यावर त्याला लगेच हॉस्पिटलमद्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला. पण तो वाचू शकला नाही.

पुनीतचं अंत्यसंस्कार राजकीय सन्मानासोबत केलं जाणार आहे. त्याची मुलगी वंदीता अमेरिकेहून परत येण्याची वाट बघितली जात आहे. वंदीता आल्यावरच त्याच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे.
 

Web Title: Late Kannada star Puneet Rajkumar illuminated a life on the way donated the eyes of the actor/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.