२५ वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा जागा झाला; 'क्योंकी सास भी..'चा पहिला प्रोमो रिलीज, तुलसीने जिंकलं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:46 IST2025-07-19T12:46:15+5:302025-07-19T12:46:44+5:30
'क्योंकी सास भी कभी बहू थी'च्या नवीन सीझनचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमा पाहून तुम्ही आनंदी व्हाल आणि पटकन जुना काळ जगल्यासारखा वाटेल

२५ वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा जागा झाला; 'क्योंकी सास भी..'चा पहिला प्रोमो रिलीज, तुलसीने जिंकलं मन
सध्या मनोरंजन विश्वात एका मालिकेची चांगलीच चर्चा सुरु आहे. ही मालिका म्हणजे 'क्योंकी सास भी कभी बहू थी'. या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सीझन अर्थात 'क्योंकी सास भी कभी बहू थी २'ची सर्वांनाच चांगलीच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी या नव्या सीझनची घोषणा होणारा प्रोमो रिलीज झाला होता. आता 'क्योंकी सास भी कभी बहू थी'च्या नवीन सीझनचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. तुलसीच्या भूमिकेत स्मृती इराणींनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
'क्योंकी सास भी कभी बहू थी'चा पहिला प्रोमो
स्टार प्लसने 'क्योंकी सास भी कभी बहू थी'चा पहिला प्रोमो सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला दिसतं की, तुलसी तिच्या लॅपटॉपवर काम करत असते. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांबद्दल ती भावना व्यक्त करताना दिसते. अनेक वर्षात कुटुंबाला जो संघर्षाचा सामना करावा लागला त्याविषयी तुलसी बोलताना दिसते. कुटुंबाच्या जुन्या फोटोंवर तुलसी एक नजर फिरवते.
त्यानंतर या व्हिडीओत दिसतं की, तुलसी 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मधील बाँच्या तसबिरीसमोर उभी राहून तिला श्रद्धांजली देताना दिसते. सुधा शिवपुरी यांनी बाँ ही भूमिका मालिकेत साकारली होती. पण आता त्या ह्या जगात नाहीत. त्यामुळे मालिकेच्या प्रोमोत तुलसी बाँ ला श्रद्धांजली देताना दिसते. पुढे तुलसी काळ कितीही पुढे गेला तरी संस्कारांचं महत्व सांगताना दिसते. 'बदलत्या काळानुसार नवा दृष्टीकोन घेऊन तुलसी परत येतेय', असं कॅप्शन देऊन हा प्रोमो शेअर करण्यात आलाय. 'क्योंकी सास भी कभी बहू थी'चा हा नवा सीझन २९ जुलैपासून रात्री १०.३० वाजता स्टार प्लस आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.