Sacred Games: तब्बल ७ वेळा शूट झाला होता Nawazuddin Siddiqui-Kubbra Sait चा इंटिमेट सीन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:36 PM2021-10-25T14:36:31+5:302021-10-25T14:37:16+5:30

Sacred Games: नेटफ्लिक्सवर (Netflix) तुफान गाजलेली वेब सीरिज (web series) म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games). या सीरिजचे दोन्ही भाग सोशल मीडियावर तुफान गाजले.

kubbra sait on intimate scene kubbra sait opened up about intimate scenne in sacred games with nawazuddin siddiqui | Sacred Games: तब्बल ७ वेळा शूट झाला होता Nawazuddin Siddiqui-Kubbra Sait चा इंटिमेट सीन

Sacred Games: तब्बल ७ वेळा शूट झाला होता Nawazuddin Siddiqui-Kubbra Sait चा इंटिमेट सीन

googlenewsNext
ठळक मुद्दे'हा सीन झाल्यानंतर मी प्रचंड रडले होते', असं ती म्हणाली आहे.

नेटफ्लिक्सवर (Netflix) तुफान गाजलेली वेब सीरिज (web series) म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games). या सीरिजचे दोन्ही भाग सोशल मीडियावर तुफान गाजले. विशेष म्हणजे अजूनही या सीरिजची लोकप्रियता कायम आहे. ही सीरिज त्यातील हॉट सीन, संवाद यांच्यामुळे खऱ्या अर्थाने चर्चेत आली. परंतु, हे हॉट किंवा इंटिमेट सीन (Intimate Scene) शूट करणं सीरिजमधील कलाकारांसाठी सोपं नव्हतं. अलिकडेच एका मुलाखतीत या सीरिजमधील कुकू  म्हणजेच अभिनेत्री कुब्रा सैतने (Kubbra Sait)  नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत (Nawazzuddin Siddiqui) दिलेल्या इंटिमेट सीनवर भाष्य केलं आहे. 'हा सीन झाल्यानंतर मी प्रचंड रडले होते', असं ती म्हणाली आहे.

सेक्रेड गेम्समध्ये कुब्राने कुकू या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. सीरिजसोबत तिचीही भूमिका गाजली. या सीरिजमध्ये कुब्रा आणि नवाजुद्दीनचा एक इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता. मात्र, हा सीन झाल्यावर कुब्रा जमिनीवर बसून रडू लागली. इतकंच नाही तर तिच्या रडण्यावर नवाजुद्दीनने थक्क करणारी प्रतिक्रिया दिली होती.

७ वेळा शूट केला इंटिमेट सीन 

नवाजुद्दीनसोबत इंटिमेट सीन करताना प्रचंड अडचणी येत होत्या. त्यामुळे कंटाळून मला रडू कोसळलं. जवळपास ७ वेळा आम्ही हा सीन शूट केला होता. कारण, हा सीन ७ वेगवेगळ्या अॅगलमध्ये असावा अशी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची इच्छा होती.  हा सीन उत्तम आणि परफेक्ट होण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती.

कुब्राच्या भावनांचा फूटला बांध

"अनुराग कश्यपच्या सांगण्यावरुन प्रथम हा सीन शूट करण्यात आला. त्यानंतर लगेचच दुसरा सीनदेखील शूट करु असं त्यांनी सांगितलं. असं एक-एक करत त्यांनी सात वेळा हा सीन शूट करुन घेतला. परंतु, अखेर सातव्या शूटनंतर माझ्यातली सहनशक्ती संपली आणि मला रडू कोसळलं. माझं रडू पाहून अनुराग कश्यप माझ्या जवळ आले आणि धन्यवाद म्हणाले."

"मी रडत असताना नवाजुद्दीन माझ्या जवळ आले आणि तुला बाहेर जाण्याची गरज आहे. कारण, मला माझ्या उर्वरित सीनचं शूट करायचं आहे, असं म्हणाले. त्यांच्या या वाक्याने मी थक्कच झाले होते."

दरम्यान, कुब्रा सेक्रेड गेम्स व्यतिरिक्त सलमान खानच्या 'रेडी', 'जवानी जानेमन', 'डॉली किटी', 'वो चमकते सितारे' या चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Web Title: kubbra sait on intimate scene kubbra sait opened up about intimate scenne in sacred games with nawazuddin siddiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.