कोंकणा - रणवीर होणार विभक्त
By Admin | Updated: September 14, 2015 14:59 IST2015-09-14T14:56:26+5:302015-09-14T14:59:32+5:30
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी हे दोघे एकमेकांपासून विभक्त होणार असून सोशल नेटवर्किंग साटवरून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

कोंकणा - रणवीर होणार विभक्त
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कोंकणा-रणवीरच्या लग्नाला ५ वर्ष झाली असून त्यांना एक मुलगाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या सेपरेशनच्या अफवा ऐकू येत होत्या, मात्र आता त्या दोघांनीही सोशल मीडिया साईटवरून आपण विभक्त होत असल्याचे जाहीर करत बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.
'मी आणि रणवीर दोघांनीही परस्पर समंतीने वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. मात्र मित्र व आमच्या मुलाचे पालक म्हणून आम्ही दोघे नेहमीच एकत्र असू.' असे ट्विट करत कोंकणाने हा निर्णय जाहीर केला आहे.
अतिशय संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी कोंकणा व एक चतुरस्त्र अभिनेता असलेला रणवीर हे दोघेही २००७ पासून रिलेशनशीपमध्ये होते. २०१० साली एका खासगी समारंभात ते विवाहबद्ध झाले. त्या दोघांनी 'ट्रॅफिक सिग्नल', 'मिक्स्ड डबल्स', 'आजा नचले' आणि 'गौरी हरी दास्तान' या चित्रपटांत एकत्र काम केले आहे.