रणबीर बनणार किशोर कुमार

By Admin | Updated: November 25, 2014 00:21 IST2014-11-25T00:21:49+5:302014-11-25T00:21:49+5:30

अभिनेता रणबीर कपूर दिवंगत गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू करणार आहे.

Kishore Kumar will become Ranbir | रणबीर बनणार किशोर कुमार

रणबीर बनणार किशोर कुमार

अभिनेता रणबीर कपूर दिवंगत गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू करणार आहे. सध्या रणबीर अनुरागच्याच ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात काम 
क रत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे पुढील दोन वर्षे अनुराग फक्त रणबीरसोबत चित्रपट बनवणार आहे. यापूर्वी 2क्12 मध्ये या जोडीचा ‘बर्फी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला, तेव्हापासूनच अनुराग रणबीरचा फॅन बनला आहे. या दोघांनी तर पिक्चर शुरू नावाच्या एका प्रोडक्शन हाऊसची स्थापनाही केली आहे. या बॅनरखाली रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांवर आधारित एक सिरीज बनवण्याची अनुरागची तयारी आहे.

 

Web Title: Kishore Kumar will become Ranbir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.