केतकीचे टॉलिवूडमध्ये पदार्पण
By Admin | Updated: October 18, 2015 23:58 IST2015-10-18T23:58:33+5:302015-10-18T23:58:33+5:30
ती ‘शाळा’मधील साधी, दोन वेण्या घातलेली आणि ‘टाईमपास’मधील प्रेमात पडलेली केतकी आठवतेय? हा..तीच ती गायिका पण आहे....तिची काय आता इतकीच ओळख राहिली नाहीये बरं का

केतकीचे टॉलिवूडमध्ये पदार्पण
ती ‘शाळा’मधील साधी, दोन वेण्या घातलेली आणि ‘टाईमपास’मधील प्रेमात पडलेली केतकी आठवतेय? हा..तीच ती गायिका पण आहे....तिची काय आता इतकीच ओळख राहिली नाहीये बरं का...तर हिने चक्क या वयात टॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ चित्रपट हिंदी-तमीळ भाषेतही येणार आहे. यामध्ये साऊथ इंडियन अभिनेता अरविंद स्वामी, बॉलिवूड अभिनेत्री टिस्का चोप्रा आदी कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यामुळे यामध्ये बाकी कास्टिंग वेगळी असली, तरी केतकी मात्र या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी मराठी माणसांच्या या रूढीला अनुसरूनच इतर समाजातही या प्रथेशी साधर्म्य असणाऱ्या, मात्र वेगळ्या भाषेत ‘काकस्पर्श’ हा चित्रपट महेश मांजरेकर यांना काढायचा होता आणि या वेगळ्या भाषेतील चित्रपटातही त्यांनी आपल्याला संधी दिल्याचा खूप आनंद झाल्याची भावना केतकी व्यक्त करते.