‘केतकी-हृषिकेशच्या आवाजात ‘रोमँटिक साँग’

By Admin | Updated: December 10, 2015 02:11 IST2015-12-10T02:11:18+5:302015-12-10T02:11:18+5:30

टाइमपासमध्ये अभिनयाबरोबरच ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्यातून केतकी माटेगावकरने प्रेक्षकांना विशेषत: तरुणाईला चांगलेच इम्प्रेस केले

'Ketki-Hrishikesh's voice' romantic song ' | ‘केतकी-हृषिकेशच्या आवाजात ‘रोमँटिक साँग’

‘केतकी-हृषिकेशच्या आवाजात ‘रोमँटिक साँग’

टाइमपासमध्ये अभिनयाबरोबरच ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्यातून केतकी माटेगावकरने प्रेक्षकांना विशेषत: तरुणाईला चांगलेच इम्प्रेस केले. आता पुन्हा एकदा आगामी ‘फुंतरू’ चित्रपटात अभिनयासमवेत तिचे मधुर सूरदेखील अनुभवायला मिळणार आहेत. या चित्रपटात एका हटके लूक्समध्ये ती पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या रोमँटिक गाण्याचे ध्वनिमुद्रण नुकतेच केतकी आणि हृषिकेशच्या आवाजात पुण्यातल्या डॉन स्टुडिओमध्ये पार पडले. या निमित्ताने प्रथमच दोघांनी एकत्रितपणे गाणे गायले आहे. सध्याचा आघाडीचा गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले ‘मनाला मनाची ओढ लागते पुन्हा पुन्हा.. ’ हे गीत हृषिकेश दातार, जसराज जोशी आणि सौरव भालेराव या संगीतकार त्रिकुटाने संगीतबद्ध केले आहे.

Web Title: 'Ketki-Hrishikesh's voice' romantic song '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.