केदारची नाट्यरसिकांन दिवाळी भेट

By Admin | Updated: October 24, 2016 01:50 IST2016-10-24T01:50:57+5:302016-10-24T01:50:57+5:30

केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी चित्रपट असो किंवा नाटक, प्रेक्षकांसाठी खास मेजवानी नेहमीच घेऊन येते.

Kedar's Natyarasikan Diwali visit | केदारची नाट्यरसिकांन दिवाळी भेट

केदारची नाट्यरसिकांन दिवाळी भेट

केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी चित्रपट असो किंवा नाटक, प्रेक्षकांसाठी खास मेजवानी नेहमीच घेऊन येते. आता या जोडीने नाट्यरसिकांसाठी एक खास नाटक आणले आहे. ‘सौजन्याची ऐशीतैशी’ असे या नाटकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, हे नाटक दिवाळीच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे नुकतेच दुसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरवर आपल्याला भरत जाधव हटके लुकमध्ये दिसत आहे. परंतु, यामध्ये भरतची नायिका कोण? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असणार. तर, या नाटकामध्ये आपल्याला अभिनेत्री स्मिता गोंदकरदेखील पाहायला मिळणार आहे. या नाटकाचे
लेखन वसंत सबनीस यांचे आहे.
तर, निर्मिती अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे यांनी केली आहे. भरत-केदार जोडीने रंगभूमीवर अनेक नाटके रंगविली आहेत. ही जोडी एकत्र आली, की नक्कीच काहीतरी भन्नाट आणि वेगळे नाटक पाहायला मिळणार, असा विश्वास प्रेक्षकांना आहे.

Web Title: Kedar's Natyarasikan Diwali visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.