KBC10 : बिनिता जैन करणार सामाजिक कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 18:40 IST2018-10-05T18:38:08+5:302018-10-05T18:40:25+5:30

कौन बनेगा करोडपतीच्या दहाव्या सीझनमधील पहिली कोट्याधीश बिनीता जैन यांनी १५ प्रश्नांची उत्तरे देऊन एक कोटी जिंकले.

KBC10: The work done by Binita Jain | KBC10 : बिनिता जैन करणार सामाजिक कार्य

KBC10 : बिनिता जैन करणार सामाजिक कार्य

ठळक मुद्देआसामच्या बिनिता जैन जिंकल्या एक कोटीएक कोटीतून मुलासाठी क्लिनिक बनवणार - बिनिता

कौन बनेगा करोडपतीच्या दहाव्या सीझनमध्ये आसामच्या बिनिता जैन एक कोटी रुपये जिंकले आहेत. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर बिनिता यांना सात कोटींचा प्रश्नदेखील विचारण्यात आला होता. मात्र शेवटच्या प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यामुळे बिनिता यांनी खेळ तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला व एक कोटी रुपयांमध्ये समाधान मानले.

एक कोटी रुपयांचे काय करणार असल्याचे विचारले असता बिनिता जैन म्हणाल्या की, हे  एक कोटी माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. इतरांप्रमाणे आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीसाठी मला हे पैसे वापरायचे आहेत. सध्या माझ्यासाठी माझ्या मुलाचे करियर खूप महत्त्वाचे आहे. तो डेन्टिस्ट असून आता तो एमडी करतो आहे. सात-आठ महिन्यांमध्ये तो ऑर्थोडोन्टिक्स बनेल. मला या पैशातून त्याच्यासाठी एक क्लिनिक बनवायचे आहे. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात मला माझ्या परीने शक्य तेवढे सामाजिक कार्य करायचे आहे. ज्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडे कोचिंग क्लास परवडत नाही. त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे. 


या सीझनची पहिली कोट्याधीश बिनीता जैन यांनी १५ प्रश्नांची उत्तरे देऊन एक कोटी जिंकले. बिनीता यांनी योग्य पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. स्वतः अमिताभ बच्चन हे बिनिता यांची हुशारी पाहून आवाक झाले होते. बिनिता यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगताना म्हणाले की, अमिताभ बच्चन हे नम्र व चांगले व्यक्ती आहेत. ते दिग्गज अभिनेते आहेत. त्यांना इतक्या जवळून मला पाहता आले याचा मला खूप आनंद आहे. 

Web Title: KBC10: The work done by Binita Jain