‘कट्यार काळजात घुसली’ची इफ्फीमध्ये निवड
By Admin | Updated: November 5, 2015 01:27 IST2015-11-05T01:27:50+5:302015-11-05T01:27:50+5:30
मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली़’ पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं

‘कट्यार काळजात घुसली’ची इफ्फीमध्ये निवड
मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली़’ पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रूपेरी पडद्यावर आणण्याचे शिवधनुष्य पेललं आहे युवा अभिनेता सुबोध भावे याने. चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरलेल्या या त्याच्या भव्यदिव्य कलाकृतीने प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच उंचावल्या आहेत. त्याच्या फर्स्ट लूक आणि टे्रलरमुळे हा चित्रपट पाहण्याची रसिकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
या चित्रपटाची लोकप्रियता पाहता गोवा येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये फीचर फिल्म ज्युरी आॅफ इंडियन पॅनोरमा या विभागात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाची निवड झाली आहे. देशभरातील रसिकांसाठी येत्या २१ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचे सादरीकरण होणार आहे.