कतरिना मेणाची
By Admin | Updated: March 28, 2015 23:09 IST2015-03-28T23:09:47+5:302015-03-28T23:09:47+5:30
लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसाँ म्युझियममध्ये आता बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने स्थान मिळवले आहे. कतरिना कैफच्या हस्ते या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले.

कतरिना मेणाची
लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसाँ म्युझियममध्ये आता बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने स्थान मिळवले आहे. कतरिना कैफच्या हस्ते या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. हा मेणाचा पुतळा समोर येताच, किती हुबेहूब माझ्यासारखाच दिसतो आहे अशी प्रतिक्रिया कतरिनाने दिली. मादाम तुसाँ म्युझियममध्ये बॉलीवूडच्या प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या तिघींपैकी कोणाचा पुतळा ठेवला जावा याकरिता मतदान घेण्यात आले होते. यात कतरिनाने बाजी मारली.