कॅटरीनामुळे गर्लफ्रेंडसोबत भांडला सलमान?

By Admin | Updated: April 27, 2017 20:07 IST2017-04-27T20:07:46+5:302017-04-27T20:07:46+5:30

बॉलवूडचा दबंग सलमान खान त्याच्या गर्लफ्रेंड आणि भांडणामुळे सतत चर्चेत असतो.

Katrina Kaif, girlfriend Salman? | कॅटरीनामुळे गर्लफ्रेंडसोबत भांडला सलमान?

कॅटरीनामुळे गर्लफ्रेंडसोबत भांडला सलमान?

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलवूडचा दबंग सलमान खान त्याच्या गर्लफ्रेंड आणि भांडणामुळे सतत चर्चेत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता सलमान खान आणि त्याची लेडी लव्ह लुलिया वंतुर यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. या लव्ह बर्डच्या भांडणाचे कारण आहे सलमानची एक्स गर्लफ्रेंड कॅटरीना कैफ.
आज तकच्या वृत्तानुसार, सलमान खानचे Dabangg Tour ला जण्यापूर्वी लुलिया वंतुरशी भांडण झाले होते. सलमान खान सध्या आगामी टुबलाईट चित्रपटाच्या प्रमोशन आणि टायगर जिंदा है च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अली अब्बास जफर यांच्या चित्रपटामध्ये सलमान सोबत कॅटरीना कैफ झळकणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सलमान खानची कॅटरीनाशी वाढलेली जवळीक या भांडणाचे मुख्य कारण आहे.
लुलिया वंतुर सलमान खानसोबत Dabangg Tour ला जाण्यास उत्सुक होती पण सलमान खानने तिला येण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर दोघामध्ये भांडण सुरु झाले. कॅटरीना कैफने आज सोशल मीडिया असलेल्या इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. सलमान कानने कॅटरीना सोबतचा फोटो शेअर करत तिचे अभिनंदन केले आहे. सलमानच्या कौटुंबिक सोहळ्यात लुलिया हजेरी लावत असते आणि सलमान जातीने तिची सरबराई करतो असा गेल्या काही महिन्यांतला अनुभव आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला सलमानने एक महागडी कार लुलियाला भेट दिल्याचे वृत्त आले होते.

कोण आहे लुलिया वंतुर -
३४ वर्षीय लुलिया ही रोमानियाची रहिवासी असुन ती एक मॉडेल आणि टीव्ही होस्ट सुद्धा आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी सलमान खान एक था टायगर या चित्रपटाच्या शुटींगसाठी दुबईत गेला होता त्यावेळी त्याची लुलियासोबत भेट झाली होती.

Web Title: Katrina Kaif, girlfriend Salman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.