ब्रेकअपवर बोलल्याने कॅटरिना रणबीरवर नाराज

By Admin | Updated: August 31, 2016 09:56 IST2016-08-31T09:56:21+5:302016-08-31T09:56:21+5:30

अभिनेता रणबीर कपूर व्यक्तीगत आयुष्याबद्दल प्रसारमाध्यमांजवळ फारच कमी बोलतो. त्यातही प्रेम प्रकरणाचा विषय असेल तर त्याबद्दल बोलणे तर टाळतोच.

Katrina angry at Ranbir after speaking on breakup | ब्रेकअपवर बोलल्याने कॅटरिना रणबीरवर नाराज

ब्रेकअपवर बोलल्याने कॅटरिना रणबीरवर नाराज

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३१ - अभिनेता रणबीर कपूर व्यक्तीगत आयुष्याबद्दल प्रसारमाध्यमांजवळ फारच कमी बोलतो. त्यातही  प्रेम प्रकरणाचा विषय असेल तर त्याबद्दल बोलणे तर टाळतोच. पण अलीकडेच रणबीरने एका मुलाखतीत कॅटरिना कैफ बरोबर झालेल्या ब्रेकअपवर भाष्य केले. 
 
कॅटरिना आपल्या आयुष्यातील एक महत्वाची व्यक्ती होती असे त्याने सांगितले. रणबीरने जाहीरपणे प्रसारमाध्यमांजवळ आपल्या नात्याबद्दल अशा प्रकारे बोलणे कॅटरिनाला अजिबात पटलेले नाही. रणबीरने पत्रकारांजवळ प्रेम आणि ब्रेकअपबद्दल बोलायला नको होते असे तिचे मत आहे. 
 
प्रेमाच्या नात्यामध्ये दोन व्यक्ती असतात. त्यामुळे नेमके काय घडले ते त्या दोघांनाच माहिती असते. त्यामुळे त्याबद्दल एका व्यक्तीने काहीही बोलणे योग्य नाही. माझा देवावर विश्वास आहे त्यामुळे काय बरोबर, काय चूक त्याला माहित आहे असे कॅटरिनाने सांगितले. 

Web Title: Katrina angry at Ranbir after speaking on breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.