करिष्माचा पहिला पती संजय कपूर तिसरे लग्न करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 17:54 IST2017-03-16T17:54:20+5:302017-03-16T17:54:20+5:30
अभिनेत्री करिष्मा कपूर बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर पुन्हा एकदा विवाहाच्या बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे.

करिष्माचा पहिला पती संजय कपूर तिसरे लग्न करणार?
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - अभिनेत्री करिष्मा कपूर बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर पुन्हा एकदा विवाहाच्या बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे. करिष्मा प्रमाणे संजयनेही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटानंतर करिष्माच्या आयुष्यात उद्योगपती संदीप तोशनीवालने प्रवेश केल्याची चर्चा आहे. बॉलिवूडलाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार एप्रिल महिन्यात संजय आणि प्रिया सचदेवचा विवाह होऊ शकतो.
करिष्माकडून घटस्फोट घेताना आरोपांचा सामना करावा लागल्याने कपूर कुटुंबिय संजयच्या लग्नाबद्दल बोलायला फारसे उत्सुक नाहीत. संजय कपूरचा हा तिसरा विवाह असेल. प्रिया सचदेव यापूर्वी न्यूयॉर्कस्थित उद्योगपती विक्रम चटवाल बरोबर लग्न झाले होते. प्रिया आणि संजय 2013 पासून परस्परांच्या प्रेमात असल्याचे सांगितले जाते.
आता करिष्मा बरोबर घटस्फोट झाल्यामुळे संजय आणि प्रियाने आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी विवाहाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. संजय आणि करिष्माचे घटस्फोटाचे प्रकरण माध्यमांध्ये बरेच गाजले. प्रिया सचदेवचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही. त्या नात्याचा शेवटही कटू झाला.
संजय आणि करिष्माचे 2003 मध्ये लग्न झाले. त्यांनी 2010 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. जुलै 2016 मध्ये बांद्रयातील कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. संजयपासून करिष्माला समायरा (11) आणि कियान राज (6) दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले करिष्माजवळ राहतात.