करिना तिच्या नव्या सिनेमासाठी घेणार 6 कोटी?

By Admin | Updated: April 20, 2017 13:56 IST2017-04-20T13:40:58+5:302017-04-20T13:56:03+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरच्या आयुष्यात सध्या सुखाचा काळ सुरु आहे. एकापाठोपाठ एक तिच्या आयुष्यात आऩंदाच्या घटना घडत आहेत.

Karina to take her cinema for 6 crore? | करिना तिच्या नव्या सिनेमासाठी घेणार 6 कोटी?

करिना तिच्या नव्या सिनेमासाठी घेणार 6 कोटी?

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 20 - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरच्या आयुष्यात सध्या सुखाचा काळ सुरु आहे. एकापाठोपाठ एक तिच्या आयुष्यात आऩंदाच्या घटना घडत आहेत. मुलगा तैमूरच्या जन्माने आऩंदात असलेल्या करिनाला आता एका बडया बॅनरचा सिनेमा मिळाल्याची चर्चा आहे. महत्वाच म्हणजे या प्रोजेक्टसाठी करिनाला रग्गड पैसा मिळणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. 
 
करीनाच्या या नव्या सिनेमाचे नाव किंवा कथानक अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. पण करीनाला जो रोल ऑफर केलाय त्या रोलसाठी ती प्रचंड उत्सुक असून, तिला या चित्रपटासाठी तब्बल सहा कोटी रुपयांचे मानधन मिळणार असल्याची चर्चा आहे. करिना सध्या तिचे वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. आगामी "वीरे दी वेडिंग" चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधी करिनाने पूर्वीसारखे स्लीम आणि फिट होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 
 
गर्भवती राहिल्यानंतर करिनाने चित्रपटात काम करणे पूर्णपणे थांबवले होते. आता पुन्हा एकदा झोकात पुनरागमन करण्यासाठी करिना सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. पूर्वी अभिनेत्रीचे लग्न झाल्यानंतर तिच्याबद्दलची चाहत्यांची क्रेझ संपून जायची. पण आजच्या जमान्यात लग्न, मुलबाळ झाल्यानंतरही निर्माते अभिनेत्रींच्या दारात रांगा लावतात. करीनामध्ये सौदर्य आणि अभिनय दोघांचा मिलाफ असल्यामुळे चाहते तिला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. 

Web Title: Karina to take her cinema for 6 crore?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.