करीना म्हणते, मी नियम तोडतेय का ?

By Admin | Updated: February 17, 2016 02:09 IST2016-02-17T02:09:17+5:302016-02-17T02:09:17+5:30

करिना कपूर खान ही नेहमी आगळ्यावेगळ्या भूमिका शोधत असते. तिचा आगामी चित्रपट ‘की अँण्ड का’ मध्ये ती अर्जुन कपूर सोबत काम करत आहे.

Kareena says, do I break the rules? | करीना म्हणते, मी नियम तोडतेय का ?

करीना म्हणते, मी नियम तोडतेय का ?

करिना कपूर खान ही नेहमी आगळ्यावेगळ्या भूमिका शोधत असते. तिचा आगामी चित्रपट ‘की अँण्ड का’ मध्ये ती अर्जुन कपूर सोबत काम करत आहे. ती म्हणते की, ‘तरूण अभिनेत्यासोबत मी काम करतेय तर मी काही चुकीचे करत आहे का? तर नाही.’ ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटात तिन महत्त्वाकांक्षी महिलेची भूमिका केली आहे. ‘मी कुठलाही नियम मोडत नाहीये. मी एक अभिनेत्री असून माझ्या रक्तातच अभिनय आहे. मी आत्तापर्यंत अनेकांसोबत काम केले आहे. कलाकाराने ज्याच्यासोबत कम्फर्टेबल आहात त्याच्यासोबत काम करावे. नेहमीच्याच जोड्या कधीकधी काम करत नाहीत. पण अशा वेगळ्या जोड्या कधीकधी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

Web Title: Kareena says, do I break the rules?