करणला हवीय नोकरी
By Admin | Updated: August 1, 2014 23:57 IST2014-08-01T23:57:15+5:302014-08-01T23:57:15+5:30
निर्माता दिग्दर्शक करण जोहरला सध्या नोकरी हवी आहे. त्याने टिष्ट्वटरवर त्याला नोकरीची गरज असल्याचे म्हटले आहे.

करणला हवीय नोकरी
निर्माता दिग्दर्शक करण जोहरला सध्या नोकरी हवी आहे. त्याने टिष्ट्वटरवर त्याला नोकरीची गरज असल्याचे म्हटले आहे. नुकतेच करणने सलमानला त्याच्या शुद्धी या चित्रपटासाठी साईन केले आहे. सलमान या चित्रपटासाठी १५० कोटींची फी घेणार असल्याच्या बातम्या होत्या. त्याशिवाय आमिर खानलाही एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी करण १५० कोटी रुपये देणार असल्याचे सांगण्यात येत होत्या. या बातम्यांवर नाराज असलेल्या करणने त्याचे म्हणणे टिष्ट्वटरवर मांडले.
करणने टिष्ट्वट केले की, ‘अशाप्रकारे मी दोन सुपरस्टार्सना ३०० कोटी वाटले..जर हे खरे असेल, तर आता मला एक नोकरी, एक घर आणि एका नव्या जीवनाचा शोध घ्यावा लागेल.’ सलमान आणि आमिर या दोन्ही सुपरस्टार्सना ३०० कोटी रुपये दिल्याच्या बातम्या अफवा असल्याचे करणने स्पष्ट केले आहे.