तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:53 IST2025-07-03T10:53:02+5:302025-07-03T10:53:39+5:30
करण कुंद्रा ट्रोलर्सला वैतागला, म्हणाला...

तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) त्याच्या रिलेशनशिप्समुळे कायम चर्चेत राहिला आहे. करिअरच्या सुरुवातीला तो कृतिका कामराला डेट करत होता. दोघांची 'कितनी मोहोब्बत है' मालिका खूप गाजली होती. तर मधल्या काळात तो अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तिच्याशी ब्रेकअप होताच तो गेल्या काही वर्षांपासून तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. दोघं एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले आहेत. मात्र त्यांच्याही ब्रेकअपच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. सध्या सोशल मीडियावर करण कुंद्राला रिलेशनशिप्सवरुन टखूप ट्रोल करण्यात येत आहे. यावरुन करणने ट्रोलर्सला एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
करण कुंद्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्यासंबंधी सर्व बातम्यांचे स्क्रीनशॉट टाकले आहेत. यामधअये तेजस्वी आणि त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा, तेजस्वीसाठीच अनुषाला सोडल्याची बातमी आहे. या सगळ्या फोटोंवर कॅप्शन देत करणने लिहिले, "माझ्या हितचिंतकांनो, थोडा आणखी पैसा लावा...तुम्ही इथे काहीही साध्य करु शकणार नाही." तसंच त्याने ट्विटरवरही ट्रोलर्सला उत्तर देत लिहिले. त्याच्या विरोधात चालणाऱ्या सर्व स्टोरीज पेड असल्याचं त्याचं म्हणणं आहे. हे मिडिया पेजेस नाही तर युट्यूब चॅनल्स आहेत जे खोट्या बातम्या पसरवत आहेत. तो लिहितो, "या लोकांसाठी एक गो फंड मी सुरु करण्याचा माझा विचार करतोय. बिचारे कमी बजेट वाल्या पेजेसलाच पैसे देत आहेत..दु:खद."
Thinking of setting up a gofundme for these people bechare low budget pages ko hi pay kar pa rahein hain.. #sad
— Karan Kundrra (@kkundrra) July 2, 2025
या एका वाक्यातून करणने सर्व ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश २०२२ साली बिग बॉस च्या १५ व्या सीझनमध्ये भेटले. तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. त्याआधी करण अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. सध्या करण 'लाफ्टर शेफ्स सीझन २' मध्ये दिसत आहे. तसंच तो प्राईम व्हिडिओवरील 'द ट्रेटर्स' शोमध्येही झळकला.