अवघ्या पाच मिनिटात बिबरच्या कॉन्सर्टमधून बाहेर पडले करण-बिपाशा
By Admin | Updated: May 11, 2017 14:22 IST2017-05-11T14:22:50+5:302017-05-11T14:22:50+5:30
बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींप्रमाणे अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर सुद्धा काल रात्री जस्टीन बिबरच्या म्युझिकल कॉन्सर्टला आले होते.

अवघ्या पाच मिनिटात बिबरच्या कॉन्सर्टमधून बाहेर पडले करण-बिपाशा
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींप्रमाणे अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर सुद्धा काल रात्री जस्टीन बिबरच्या म्युझिकल कॉन्सर्टला आले होते. पण संयोजनातील गलथानपणामुळे अवघ्या पाच मिनिटात त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही कॉन्सर्टचा आनंद घ्यायचा होता. पण बिपाश-करणने जे ठरवले होते तसे घडले नाही.
कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी करण-बिपाशा उशिरा 8.30 वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले. तो पर्यंत कार्यक्रम सुरु झाला होता. बिपाशा आणि करण जेव्हा कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले तेव्हा स्टेडियमच्या बाहेर मोठा जमाव ताटकळत उभा होता. बिपाशा आणि करण प्रवेशव्दारापाशी येताच त्यांना मोठया गर्दीचा सामना करावा लागला. या गर्दीला आवरणारे कोणीही तिथे नव्हते. फक्त गोंधळ सुरु होता. उगाचच धोका पत्करुन आत जाण्यापेक्षा त्यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला असा या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.
कॉन्सर्टचा बेत फसल्यानंतर बिपाशा आणि करण एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले. बिपाशाने तिच्या इऩ्स्टाग्रामवर डिनरचे फोटो शेअर केले आहेत. कन्सर्टला नाही जाता आले म्हणून काय झाले? करण सोबत असताना नेहमीच मला आनंद मिळतो असे बिपाशाने तिच्या इन्स्टाग्रामवरील संदेशात म्हटले आहे. आलिया भट्ट, श्रीदेवी, बोनी कपूर, अरबाज खान, मलायका अरोरा असे अनेक सेलिब्रिटी या कन्सर्टला आले होते.