Kapil Sharma: 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे प्रमोशन का केले नाही? कपिल शर्माने स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 02:49 PM2022-03-13T14:49:22+5:302022-03-13T14:49:32+5:30

Kapil Sharma: 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या टीमला प्रमोशन करण्यासाठी न बोलवल्यामुळे कपिल शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Kapil Sharma | The Kashmie Files | Why the film 'The Kashmir Files' was not promoted in your show? Kapil Sharma clarifies | Kapil Sharma: 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे प्रमोशन का केले नाही? कपिल शर्माने स्पष्टचं सांगितलं

Kapil Sharma: 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे प्रमोशन का केले नाही? कपिल शर्माने स्पष्टचं सांगितलं

googlenewsNext

मुंबई: 'द काश्मीर फाईल्स'(The Kashmir Files ) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री (Vivek Agnihotri) यांनी कपिल शर्मावर (Kapil Sharma) मोठा आरोप केला होता. आपल्या या चित्रपटात कोणताही बडा कलाकार नसल्यामुळे कपिल शर्माने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याचे म्हटले होते. त्यानंतर कपिलला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. अनेक दिवसांनतर आता कपिलने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

सोशल मीडियावर कपिल ट्रोल
सोशल मीडियावर #BycottKapilSharmaShow या हॅशटॅगचा वापर करत नेटकरी कपिल शर्माविरोधात संताप व्यक्त करत आहेत. विवेक अग्निहोत्रींच्या या ट्विटनंतर काही दिवस कपिलने या विषयावर मौन बाळगले. मात्र आता त्याने एका नेटकऱ्याच्या ट्विटवर उत्तर देत अखेर मौन सोडलं आहे. 

काय म्हणाला कपिल ?
'द काश्मीर फाईल्सला प्रमोट करण्यास कपिल का घाबरला? त्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटत होती? विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या चित्रपटातील प्रतिष्ठित स्टारकास्टला निमंत्रण का दिले नाही? मी तुझा खूप मोठा चाहता होतो, पण तू माझी आणि द कपिल शर्मा शोच्या लाखो चाहत्यांची निराशा केलीस', असे ट्विट एका नेटकऱ्याने कपिलला टॅग करत केले.

त्यावर कपिल शर्माने उत्तर दिले. 'राठोड साहेब हे खरं नाही. तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो, पण ज्यांनी या गोष्टीला सत्य मानले आहे त्यांना स्पष्टीकरण देण्याचा काय उपयोग? मी एक सल्ला देऊ इच्छितो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात एकतर्फी कथेवर कधीच विश्वास ठेवू नका', असे कपिलने लिहिले.

काय म्हणाले होते विवेक अग्नीहोत्री?
'द काश्मीर फाईल्स'ची टीम कपिलच्या शोमध्ये का आली नाही? असा प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिले होते. 'द कपिल शर्मा शोमध्ये कोणी यायचं याचा निर्णय मी घेत नाही. कोणाला आमंत्रित करायचे आहे हे कपिल आणि निर्माते ठरवतात. बॉलिवूडबद्दल बोलायचं झाल्यास, मी हेच म्हणेन जे एकदा बच्चन सरांनी गांधींबद्दल म्हटले होते, वो राजा हैं हम रंक,'असे विवेक म्हणाले होते. त्यानंतर कपिल शर्माला ट्रोल करणे सुरू झाले.

 

Web Title: Kapil Sharma | The Kashmie Files | Why the film 'The Kashmir Files' was not promoted in your show? Kapil Sharma clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.