कपिल शर्मानं कॅनडात गोळीबार झाल्यानंतर आता 'या' देशात उघडलं 'कॅप्स कॅफे', आतून कसं दिसतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:51 IST2026-01-02T11:50:16+5:302026-01-02T11:51:10+5:30
कॅनडानंतर आता आणखी एका देशात कपिल शर्माने आपल्या 'कॅप्स कॅफे'चे नवीन आउटलेट दिमाखात सुरू केले आहे.

कपिल शर्मानं कॅनडात गोळीबार झाल्यानंतर आता 'या' देशात उघडलं 'कॅप्स कॅफे', आतून कसं दिसतं?
Kapil Sharma Opens New Outlet Kaps Cafe : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सध्या चर्चेत आहे. कॅनडातील त्याच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर कपिलने हार न मानता आपला व्यवसाय आणखी विस्तारला आहे. बुधवारी कपिलने नव्या देशात आपल्या 'कॅप्स कॅफे'चे नवीन आउटलेट दिमाखात सुरू केले आहे.
गेल्या वर्षी कपिलने कॅनडातील सरे येथे 'कॅप्स कॅफे' उघडलं होतं. मात्र, जुलै ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान या कॅफेवर तीन वेळा गोळीबार झाला. यानंतर आता कपिल आपला मोर्चा दुबईकडे वळवला आहे. कपिलनं ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुबईमध्ये त्याचे नवीन आउटलेट सुरू केले. "आमच्या हृदयापासून दुबईपर्यंत" या टॅगलाईनसह कपिलने चाहत्यांना या नवीन जागेची झलक दाखवली आहे.
पांढऱ्या-गुलाबी थीममधील हे नवीन आउटलेट अत्यंत आकर्षक दिसत आहे. 'कर्ली टेल्स'ने कपिलच्या कॅफेचा मेन्यू चाहत्यांसोबत शेअर केलाय. ज्यात पिझ्झा, बर्गर, पास्ता, कॉफी ते काही पंजाबी पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कपिलने आपल्या वैयक्तिक आवडीचं जॅगरी-इन्फ्यूज्ड लाइम ज्यूस हे ड्रिंक अर्थात लिंबू आणि गुळाचे पेय या मेनूमध्ये समाविष्ट केलं आहे.