या कारणामुळे बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही कपिल शर्मा, यामागचा अर्चना पूरण सिंगने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:01 IST2025-05-14T20:01:08+5:302025-05-14T20:01:44+5:30

Archana Puran Singh And Kapil Sharma : अर्चना पूरण सिंगने कपिल शर्माबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिचे आणि कपिलचे नाते कसे आहे हे सांगितले. कॉमेडी किंग पार्ट्यांमध्ये का जात नाही हे देखील तिने सांगितले.

Kapil Sharma doesn't go to Bollywood parties because of this, Archana Puran Singh reveals the reason behind this | या कारणामुळे बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही कपिल शर्मा, यामागचा अर्चना पूरण सिंगने केला खुलासा

या कारणामुळे बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही कपिल शर्मा, यामागचा अर्चना पूरण सिंगने केला खुलासा

अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) आणि कपिल शर्मा(Kapil Sharma)ची मैत्री आपण द कपिल शर्मा शोमध्ये अनेकदा पाहिली आहे. कपिल नेहमीच शोमध्ये अर्चना पूरण सिंगच्या मानधनावरुन थट्टा करताना दिसतात. ज्यावर अर्चना खळखळून हसतानाही दिसते. मात्र नुकतेच अर्चनाने कपिल शर्मासंदर्भात असा काही खुलासा केला आहे, ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत अर्चना पूरण सिंगने कपिल शर्मासोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, ''कॉमेडी सर्कसमध्ये तो इतर १० स्पर्धकांसारखाच होता. आमची मैत्री तेव्हापासून सुरू झाले होते. कोणाला माहित होते की ते इतके पुढे जाईल? हे असे नाते आहे जे परस्पर आदरावर आधारीत होते. मी त्याची वरिष्ठ आणि शोची जज होते. त्याच्याबद्दलचा माझा आदर वाढतच गेला. कृष्णा आणि कपिलसोबतचे माझे नाते लवकरच कुटुंबात बदलले.''

वैयक्तिक आयुष्य ठेवतो खाजगी
अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'कपिल आता माझ्यासोबत खूप कम्फर्टेबल आहे. पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप रिझर्व्ह आहे. त्याला गोष्टी खाजगी ठेवायला आवडतात. तुम्हाला तो जास्त प्रमोशन करताना दिसणार नाही. तुम्हाला तो फक्त शोमध्येच दिसेल.'

कपिल पार्ट्यांना का जात नाही?
यासोबतच अर्चना पूरण सिंगने कपिल पार्ट्यांमध्ये का जात नाही याबद्दल सांगितले? अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा तो माझ्या घरी येतो तेव्हा तो कम्फर्टेबल असतो. जर मी त्याच्या घरी गेलो तर मीही कम्फर्टेबल असते. आता आमचे नाते खूप सामान्य झाले आहे. आम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत राहायला आवडते. मात्र, आमचे संगोपन वेगळ्या पद्धतीने झाले आहे.' अर्चना पूरण सिंग 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'ची जज होती. नेटफ्लिक्सवर त्याच्या तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे.

Web Title: Kapil Sharma doesn't go to Bollywood parties because of this, Archana Puran Singh reveals the reason behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.