भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 08:46 IST2025-05-16T08:45:42+5:302025-05-16T08:46:08+5:30
भारतीय पर्यटक भारतात तुर्की अन् अझरबैजानला जाण्याचा प्लॅन रद्द करत आहेत. पर्यटन कंपन्याही नवीन बुकिंग घेत नाहीत.

भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तमाव सुरू होता. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला. यानंतर तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी पाकिस्तान पाठिंबा दिला. दरम्यान, आता या दोन देशांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम आता जोर धरू लागली आहे. परिणाम फक्त पर्यटनावरच नाही तर उड्डाण आणि व्यवसाय क्षेत्रांवरही होत आहे.
सध्या, भारतीय पर्यटक या दोन्ही देशांसाठी नवीन बुकिंग करण्यास नकार देत नाहीत तर त्यांनी आधीच केलेले बुकिंग देखील रद्द करत आहेत. पर्यटन कंपन्याही नवीन बुकिंग घेत नाहीत.
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
EaseMyTrip नुसार, तुर्कीला जाणारे २२ टक्के आणि अझरबैजानला जाणारे ३० टक्के बुकिंग रद्द करण्यात आले आहे. भारतीय पर्यटक आता जॉर्जिया, सर्बिया, ग्रीस, थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या सुरक्षित पर्यायांना प्राधान्य देत आहेत.
EaseMyTrip चे सीईओ आणि सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले की, युद्धविरामनंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे बाधित भागांसाठी बुकिंग थांबवण्यात आली आहे. तसेच, प्रभावित भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तुर्की एअरलाइन्सकडून फिनलंडला जाण्यासाठी विमानभाडे ७०,५०० रुपये आहे तर इतर एअरलाइन्सकडून १,०३,५०० रुपये आहे, तरीही लोक इतर एअरलाइन्सकडून बुकिंग करत आहेत. दरवर्षी लुधियानाहून सुमारे ५००० लोक तुर्कीला जाण्यासाठी बुकिंग करायचे पण आता सर्वांनी त्यांचे दौरे रद्द केले आहेत.
जालंधर आणि अमृतसरमध्येही अशीच परिस्थिती आहे. ट्रॅव्हल एजंट्सच्या मते, तुर्कमेनिस्तान आणि अझरबैजानसाठी कोणतेही नवीन बुकिंग केले जात नाही. भारतातील पर्यटन स्थळांचे आकर्षण बरेच लोक आता तुर्की आणि अझरबैजानचा त्यांचा प्रवास रद्द करत आहेत आणि देशात प्रवास करण्याचे नियोजन करत आहेत.
३५ सदस्यांसह तुर्की बुकिंग रद्द
दक्षिण दिल्लीतील रहिवासी राजिंदर सिंह हे एका लॉ फर्मचे सह-संस्थापक आहेत. त्यांनी त्यांच्या टीममधील ३५ सदस्यांसह, त्यांचे तुर्की बुकिंग रद्द केले आहे आणि आता तो देशात प्रवास करण्याचे नियोजन करत आहेत.