अखेर फोटोतील 'त्या' मिस्ट्री मॅनचा कंगनाने केला खुलासा; शेअर केली पोस्ट, म्हणाली, "मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 06:59 PM2024-01-13T18:59:52+5:302024-01-13T19:00:25+5:30

मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर कंगना रणौतची पोस्ट, म्हणते, "मी अनेकदा..."

kangana ranaut shared post after viral photo with mystery man revealed who is he | अखेर फोटोतील 'त्या' मिस्ट्री मॅनचा कंगनाने केला खुलासा; शेअर केली पोस्ट, म्हणाली, "मला..."

अखेर फोटोतील 'त्या' मिस्ट्री मॅनचा कंगनाने केला खुलासा; शेअर केली पोस्ट, म्हणाली, "मला..."

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत कायमच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा कंगनाच्या वक्तव्यांमुळे वादही निर्माण झाला आहे. पण, सध्या कंगना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चे आहे. नुकताच कंगनाचा एका मिस्ट्री मॅनबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत कंगना मिस्ट्री मॅनचा हात पकडून चालताना दिसत होती. हा फोटो पाहून कंगना आणि मिस्ट्री मॅन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कंगनाबरोबर फोटोत दिसणारा तो मिस्ट्री मॅन कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता खुद्द कंगनानेच याचा खुलासा केला आहे. 

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये कंगनाने व्हायरल झालेला मिस्ट्री मॅनबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कंगनाने पोस्ट लिहिली आहे. फोटोत दिसणारा मिस्ट्री मॅन हेअरस्टायलिस्ट असल्याचं कंगनाने म्हटलं आहे. "मिस्ट्री मॅनबद्दल विचारण्यासाठी अनेक मेसेज आणि कॉल मला येत आहेत. मी अनेकदा सलूनला जात असते. एक महिला आणि पुरुष रस्त्यावरुन एकत्र चालत असतील, तर त्याची अनेक कारणं असू शकतात. तो मित्र, भाऊही असू शकतो. किंवा अनेक वर्षांच्या फ्रेंडली क्लाइंटबरोबर हेअरस्टायलिस्टही असू शकतो," असं कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

याआधी कंगनाचं नाव बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनबरोबर जोडलं गेलं होतं. क्रिश ४च्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली होती. त्यामुळे हृतिक आणि कंगनाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाला आणि ते वेगळे झाले. 

Web Title: kangana ranaut shared post after viral photo with mystery man revealed who is he

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.