कंगनाची हकालपट्टी ?
By Admin | Updated: May 18, 2015 00:00 IST2015-05-18T00:00:59+5:302015-05-18T00:00:59+5:30
पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सरबजीत सिंगच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात येत आहे. यासाठी गेली कित्येक महिने त्याच्या

कंगनाची हकालपट्टी ?
पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सरबजीत सिंगच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात येत आहे. यासाठी गेली कित्येक महिने त्याच्या बहिणीच्या (दलबीर कौर) भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना रणावतचे नाव चर्चेत होते. मात्र आता या भूमिकेसाठी ‘मेरी कॉम’फेम प्रियंका चोप्राचे नाव नक्की करण्यात येत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जवाबदारी हंसल मेहता यांच्या खांद्यावरून काढून ओमंग कुमार यांच्यावर सोपवण्यात आली. म्हणूनच कंगनाऐवजी पीसीची निवड झाल्याची जोरदार चर्चा बॉलीवूडमध्ये आहे.